News

शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे. यामुळे विहिरीचे काम अगदी काही दिवसांमध्येच होते. सध्या अनेक आधुनिक यंत्रणा आल्या आहेत. यामुळे थेट भूगर्भात जाऊन या मशिनरी हे काम सहज करतात,

Updated on 27 January, 2022 10:21 AM IST

शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे. यामुळे विहिरीचे काम अगदी काही दिवसांमध्येच होते. सध्या अनेक आधुनिक यंत्रणा आल्या आहेत. यामुळे थेट भूगर्भात जाऊन या मशिनरी हे काम सहज करतात, असे असले तरी अनेकजण पाणाडी आणूनच विहिरीचे काम सुरु करतात. पाणाडी वेगवेगळ्या प्रकारे जमिनीच्या भूगर्भात पाणी आहे की नाही याचा अंदाज घेतात. काही वेळेस तो खराही ठरतो आणि अनेकदा तो खोटाही ठरतो. मात्र विहीर खोदताना पाणाडी असतोच असतो. तसेच विहिरी या जानेवारी महिन्यातच खोदल्या जातात. यामागे देखील कारण आहे.

जानेवारीमध्ये पावसाळा संपलेला असतो, यामुळे विहीर खोदताना काही अडचण येत नाही. पाण्याची पातळी ही फार खोल गेलेली नसते आणि ती उथळही नसते. पावसाळ्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये भुगर्भात पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबलेली असते. पण या प्रक्रियेमुळे भुगर्भ खोदण्यासाठीची क्रिया ही सोपी असते. कारण जमिन ही नरम झालेली असते. त्यामुळे या महिन्यात विहीरीचे खोदकाम सुरु केले तर मार्च-एप्रिल पर्यंत खोदकाम करण्यास सोपे जाते. यामुळे अनेकजण शक्यतो हाच काळ निवडतात. तसेच विहीर खोदताना कोणत्या जमिनीचा वापर योग्य ठरतो. ते देखील बघणे गरजेचे आहे.

यामध्ये ज्या जमिनीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर मुरते अशाच जमिनीचा वापर त्यांनी करावा, जेणेकरून पाण्याची पातळी जास्त राहण्यास मदत होईल. तसेच जास्त खोदताना जमीन नरमच राहील पाषाणाचा भाग लवकर येणार नाही, अशा जमिनीची निवड करावी. तसेच विहिरीची जागा टेकडावर नसावी, त्यामुळे तेथे पाणी टिकण्याची शक्यता कमी असते. विहिरींची जागा शक्यतो, नाल्या लगत, नदीपासून काही अंतरावर, मऊ खडकामध्येच असावी. त्यामुळे अधिक काळ पाणी टिकून राहते.

मांजऱ्या असलेल्या खडकाळ भागात पाणी अधिक संचयन केले जाते त्या क्षेत्रावर पाणी लागते. जाड वाळू व कंकर असलेल्या जमिनीमधील विहिरींना भरपूर पाणीपुरवठा होऊ शकतो. यामुळे अशा प्रकारे जमिनीची निवड केली तर पाणी लागेल आणि ते टिकून देखील राहील. तसेच गरजेनुसार विहिरीमध्ये आडवी होल मारावीत. यामुळे देखील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. तसेच विहिरीला रिंग टाकली तर विहिरीत घाण आणि गाळ मोठ्या प्रमाणात जात नाही. तसेच कडेची जमीन ढासळण्याची शक्यता देखील कमी असते. यामुळे ती फायदेशीर ठरते.

English Summary: Land suitable for digging wells, duration is important; The well needs water, know ...
Published on: 27 January 2022, 10:21 IST