सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ चर्चेचा विषय होत आहे. याचे कारण म्हणजे याठिकाणी होणाऱ्या विमानतळावरून अनेक वाद सुरू आहेत. या विमानतळाची जागा यावरून देखील हे वाद सुरू होते. आता शिंदे सरकारने जागा फिक्स केली असली तरी शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे.
सध्या पुरंदर येथील नियोजित जागेवर विमानतळ होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. असे असताना आता स्थानिक नागरिकांनी विमानतळाला विरोध केला आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनी विकत घेऊन विमानतळ करण्याचा घाट सरकारने घातला आहे.
याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यासाठी आम्हाला कोट्यवधी रुपये दिले तरी जमिनी देणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे हा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला सात गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण..
दरम्यान, ठाकरे सरकारने पुरंदर विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेला संरक्षण विभागाने नकार दिला. यामुळे हा पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने विमानतळ जुन्या जागेवरच करण्याचे प्रयत्न सुरू केले.
यानंतर मात्र पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सातही गावाच्या सरपंचांनी पत्रक काढत विमानतळाच्या नियोजित जागेला विरोध केला आहे. यामुळे आता पुढे काय होणार हे येणाऱ्या काळातच समजेल.
काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या, मृतदेह आढळल्याने खळबळ..
या पत्रकात गावातील एक इंचही जमीन देणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या भागामध्ये सीताफळ, आंबा, अंजीर, पेरू यांच्या फळबागा आहेत. यामधून कोट्यवधींची उलाढाल होते. यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आता कोणी कोणाचा बांध फोडला लगेच कळणार!! ड्रोनद्वारे होणार जमिनीची मोजणी..
दुःखद! आई, मुलगा आणि वडिलांचा शेतात वीज पडून मृत्यू, शेतकऱ्यांनो 'अशी' घ्या काळजी...
अतिरिक्त उसावर निघणार तोडगा! राज्यात ऊस गळीत हंगाम 15 दिवस आधीच सुरु होणार? सरकारला शिफारस..
Published on: 05 September 2022, 11:41 IST