मनूकाळा पासून जमीन महसूल व जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आलेला आहे. वेळो वेळी राज्यसत्ता व समाज धारणा बदलत गेल्या. त्या प्रमाणे जमीन महसूला बाबतच्या पध्दती व नियम वेळोवेळी बलत गेले. आजच्या भूमि अभिलेख विभागाचे स्वरुप ही त्याची परिणती आहे. भूमि अभिलेख विभागाची सुरूवात ब्रिटीश कालावधीत झाली. ब्रिटीश कालावधी पासुन ते आज पर्यंत भूमि अभिलेख विभागाने केलेली कामगिरी, भविष्यात करण्यात येणारी कामे, त्या साठीचे नियम, परिपत्रके याची माहिती जनतेस व्हावी म्हणुन यासाठी हे (bhumiabhilekh.maharashtra.gov.in ) संकेत स्थळ विकसीत करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात ह्याने माझा बांध कोरला त्याने जागा बळकावली अशी चर्चा, तक्रार प्रत्येक दुसऱ्या माणसाची असते. या सगळ्या प्रश्नांवर सरकारी मोजणी हा एवढाच उपाय आहे. जमिनीची सरकारी मोजणी कशी करायची याची सविस्तर माहिती खलिलप्रमाणे
१) सरकारी मोजणीचा अर्ज तालुका उप अधिकारी भूमीलेख यांच्याकडे करावा लागतो. तसेच हा अर्ज(bhumiabhilekh.maharashtra.gov.in) येथे पाहायला मिळेल.
२) प्रथम हा अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जात विचारेली माहिती भरणे आवश्यक आहे.
३) या अर्जात तालुका आणि जिल्हा यांची नावे विचारलेली असतात. ती सर्वात प्रथम भरावी लागतात.
४) त्यानंतर अर्जदाराचे नाव भरावे. त्यानंतर खालच्या रकान्यात कालावधी दिलेला आहे. तुम्हाला साधी किंवा तातडीची मोजणी करायची असल्यास त्यासंदर्भात माहिती लिहायची असते.
५) मोजणीच्या प्रकारानुसार त्याची रक्कम ठरत असते.
आवश्यक कागदपत्रे
१) भरलेला अर्ज
२) मोजणी फी चलन
३) तीन महिन्यांचे ७/१२ उतारे
४) जर इमारत, व इतर मालमत्तांची मोजणी करायची असेल तर तीन महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.
५) हा अर्ज भूमिलेख कार्यालयात जमा करावा. आपल्या प्रकारानुसार आपल्याला तारीख मिळते.
ग्रामपंचायत डोणजे, ता. हवेली, जि. पुणे यांच्याकडून हि माहिती देण्यात आली .
Published on: 19 November 2020, 04:08 IST