News

पावणेदोन तासात नाशिक हुन थेट पुण्याला जाणाऱ्या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली असून या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Updated on 04 April, 2022 8:22 AM IST

पावणेदोन तासात नाशिक हुन थेट पुण्याला जाणाऱ्या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली असून या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चार गावातील जिरायती जमिनीसाठी साधारणतः 55 लाख प्रति हेक्टर ते 68 लाखापर्यंत जिरायती जमिनीचे दर जाहीर करण्यात आले आहेत.  या मध्ये सिन्नर तालुक्यातील वडझिरे, दातली, पाटपिंपरी आणि बारागाव पिंपरी या गावांचा समावेश असून या गावातील मूल्यांकन बाबत बुधवारी दर निश्चिती वर शिक्कामोर्तब करण्यात आले असून प्रशासनाकडून 31 मार्चला या दरांची घोषणा झाली. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भूसंपादन समितीच्या बैठकीत हे दर निश्चित करण्यात आले आहेत.

नक्की वाचा:ईडीकडे तक्रार: विद्राव्य खते तयार करण्यासाठी अनुदानित युरियाचा वापर करणारे रॅकेट संबंधित तक्रार

आता नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होईल.

शासनाकडून वाटाघाटींच्या माध्यमातून थेट खरेदी द्वारे भूसंपादन करण्याचे नियोजन केले आहे. पाटपिंपरी, बारागाव पिंपरी, वडझिरे व दातली या गावची निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जीरायत जमिनीचा प्राथमिक निश्चित केलेला दर प्रति हेक्‍टर दहा लाख 40 हजार ते कमाल तेरा लाख 65 हजार इतका आहे. तर यामध्ये जिल्हा समितीने जिरायत जमिनीचा पाचपट प्रमाणे निश्चित केलेला प्रति हेक्‍टरी दर किमान 52 लाख 4 हजार ते कमाल 68 लाख 70 हजार रुपये इतका आहे.

नक्की वाचा:700 रुपये किलो मिरची, 200 रुपये किलो बटाटे अन चहा 100 रुपये कप, श्रीलंकेत मन सुन्न करणारी महागाई

नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 22 गावातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक गावे हे सिन्नर तालुक्यातील असून या मध्ये 17 गावांचा समावेश आहे. या सतरा गावांमधून 248.90हेक्टर जमीन संपादित करण्यात येईल तसेच नाशिक तालुक्यातील विहितगाव, देवळाली, बेलतगव्हाण, संसारी या व इतर गावातील 37.22 असे एकूण 283.12 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

English Summary: land acquire rate definit in sinner taluka for nashik pune highspeed railway
Published on: 04 April 2022, 08:22 IST