News

भारतात मोठया संख्येने शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणुन पशुपालन करत असतात, यातून पशुपालक शेतकरी चांगले उत्पन्न अर्जित देखील करतात. पण पशुपालनात पशुची निगा ठेवणे हे तेवढेच गरजेचे असते नाहीतर पशुधनाचे नुकसान होऊ शकते. पशुला अनेक रोगांची लागण होत असते आणि त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत असते, त्यामुळे पशुला होणाऱ्या रोगांवर वेळीच नियंत्रण करावे लागते.

Updated on 27 November, 2021 9:08 PM IST

भारतात मोठया संख्येने शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणुन पशुपालन करत असतात, यातून पशुपालक शेतकरी चांगले उत्पन्न अर्जित देखील करतात. पण पशुपालनात पशुची निगा ठेवणे हे तेवढेच गरजेचे असते नाहीतर पशुधनाचे नुकसान होऊ शकते. पशुला अनेक रोगांची लागण होत असते आणि त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत असते, त्यामुळे पशुला होणाऱ्या रोगांवर वेळीच नियंत्रण करावे लागते.

पशुला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रोगापैकी एक आहे लाळ्या खुरकुता हा रोग, जर यावर वेळीच लक्ष नाही दिले तर हा गंभीर ठरू शकतो. मित्रांनो लाळ्या खुरकुता ह्या आजाराचा प्रादुर्भाव हा ऐन हिवाळ्याच्या हंगामात पाहवयास मिळतो. लाळ्या खुरकुता हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लस दिली जाते. यासाठी सरकार संपूर्ण राज्यात लसीकरण देखील करत असते. पण कोरोनामुळे मागच्या वर्षी लसीकरण शक्य झाले नाही. यावर्षी देखील लाळ्या खुरकुता हा आजार आपले पाय पसरवीत आहे आणि अद्याप लसीकरण हे प्रभाविपणे झालेले दिसत नाही. लाळ्या खुरकुता साठी लस उपलब्ध नसल्याचे समजत आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभाग याकडे गांभीर्याने बघत नाही असे पशुपालक शेतकरी सांगताना दिसत आहेत.

 परभणी जिल्ह्यात जनावरांचा हा आजार विकराळ स्वरूप धारण करेल की काय असा धोका निर्माण झाला आहे. याचे कारण असे की जिल्ह्यात जवळपास चार लाख पशुना लस देण्याचे नियोजन आखण्यात आले होते मात्र हे नियोजन फक्त कागदापुरतेच मर्यादित राहिले आणि जमिनीवर मात्र परिस्थिती जैसे तीच आहे. हिवाळा सुरु होऊन बरेच दिवस झालेत मात्र अद्याप लसीकरण नाही त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन संकटात सापडू शकते कारण लाळ्या हा एक संसर्गजन्य आजार आहे, आणि लाळेद्वारे पसरतो त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे आहे. पण हे माहित असूनही अद्याप लसीकरण नाही हि एक चिंतेची बाब आहे.

मागच्या वर्षी कोरोना नामक संकटामुळे संपूर्ण जग जणु थांबलेच होते आणि ह्या कोरोनाचा परिणाम लाळ्या खुरकुत्याच्या लसीकरणवर देखील झाला होता आणि एकही लस पशुना दिली गेली नव्हती. यावर्षी देखील मराठवाड्यात याबाबत उदासीनता पाहवयास मिळत आहे. परभणी आणि औरंगाबाद मध्ये अजून लसीकरन झालेले नाही.

तर सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्ह्यात मात्र मागच्या महिन्यात लसीकरण सुरु केले गेले होते.

राहिलेल्या जिल्ह्यात लवकरच लसीकरण सुरु होणार असे संकेत दिसत आहेत, कारण लसीची मागणी हि झाली आहे आणि सात-आठ दिवसात पुरवठा देखील होईल. त्यामुळे उशिरा का होईना प्रशासन जागे झाले असेच म्हणावे लागेल.

English Summary: lalya khurkut disease spread in parbhani district due to less vaccination
Published on: 27 November 2021, 09:08 IST