News

भारतामध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, 1 जुलै रोजी भात आणि इतर उन्हाळी पिकांसह पेरणी केलेले क्षेत्र 27.872 दशलक्ष हेक्टर होते, जे एक वर्षापूर्वीच्या 29.443 दशलक्ष हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी आहे.

Updated on 09 July, 2022 4:46 PM IST

भारतामध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. परंतु अन्न उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये पाऊस अजूनही सामान्य पातळीपेक्षा कमी आहे. मात्र काही भागात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार,1 जुलै रोजी भात आणि इतर उन्हाळी पिकांसह पेरणी केलेले क्षेत्र 27.872 दशलक्ष हेक्टर होते, जे एक वर्षापूर्वीच्या 29.443 दशलक्ष हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी आहे.

सरकारच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, गहू आणि ऊसाचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये या पावसाळी हंगामात गुरुवारपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा ५५% कमी होता. धानाचे सर्वाधिक उत्पादक असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ही तूट 46% होती,तर झारखंडमध्ये ती 43% आणि ओडिशा आणि बिहारमध्ये प्रत्येकी 22% होती. गुजरात आणि केरळमधील काही भागातही सामान्यपेक्षा किंचित कमी पाऊस झाला.

वायव्य भारतात ही कमतरता 3% आणि मध्य भारतात 7% होती. परंतु गेल्या आठवड्यात या प्रदेशांमध्ये तुटवडा कमी झाला आहे. तसेच IMD ने जुलैमध्ये सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवली आहे. "मध्य भारत आणि वायव्य भारत यातून बचावले आहेत. मात्र, पूर्व भारतात चिंता कायम आहे" असे स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे अध्यक्ष जीपी शर्मा म्हणाले .येत्या आठवड्यात पूर्वेकडील भागात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असली तरी पावसात अजूनही काही प्रमाणात कमतरता राहण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

भारतात जून-सप्टेंबर नैऋत्य मान्सून दरम्यान वार्षिक पावसाच्या तीन चतुर्थांश पाऊस पडतो यातून देशाच्या कृषी उत्पादन आणि ग्रामीण उत्पन्नात वाढ होते. पावसाच्या प्रमाणाबरोबरच, त्याचा प्रसार देखील महत्वाचा आहे, कारण काही भागात अल्पावधीत मुसळधार पावसामुळे पूर येऊ शकतो आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या:

English Summary: Lack of rains hits 'most food producing' states; Farmers worried
Published on: 09 July 2022, 04:37 IST