चालू वर्षी अतिवृष्टी, तापमान वाढ, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका उन्हाळा कांदा पिकाला बसला. त्यात वाढीच्या अवस्थेत रोग, किडींचा प्रादुर्भाव, शाखीय वाढ होताना थंडीचा अभाव व वाढलेल्या तापमानामुळे कांदा मुदतपूर्व काढणीस आला.
परिणामी, एकरी ३० टक्क्यांपर्यंत उत्पादकतेत घट झाल्याचे उत्तर महाराष्ट्रात दिसून येत आहे. नाशिक विभागात चालू वर्षी १ लाख ९१ हजार ९३८ हेक्टर कांदा लागवडी आहेत. सध्या काढणीला वेग आला असून, सरासरी १५० क्विंटल मिळणारे एकरी उत्पादन १०० ते ११० क्किंटलपर्यंत मिळत आहे. तर काही ठिकाणी ७५ क्किंटलवर उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे.
सरासरी ही घट ३० टक्क्यांपर्यंत झाल्याचे चित्र आहे. डिसेंबर ते जानेवारी मध्यापर्यंत झालेल्या लागवडीमध्ये उत्पादन चांगले असले तरी घट दिसून येत आहे. तर १५ जानेवारीनंतर लागवडीत घट अधिक आहे. यावर्षी कमाल तापमान व किमान तापमानात दुपटीचा फरक राहिला. मात्र डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून हे सरासरी तापमान २७ अंश सेल्सिअस, जानेवारीत ३० तर फेब्रुवारीत ३० अंशांवर होते.
येत्या काळात दरवाढीचा आशा
कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. तूर्तास शेतकरी येत्या काळात कांद्याचे उत्पादन घटीमुळे चांगले तर मिळतील, या आशेवर आहेत.
उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे
शाखीय वाढ होण्याचा कालावधीत थंडी अभाव अन् तापमान वाढ
विविध कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची झालेली फसवणूक
जमिनीत बुरशी वाढण्यामुळे कांद्याची अपेक्षित वाढ नाही
आठ दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे काढणीपूर्व नुकसान
अधिक कालावधीच्या रोपांच्या उशिरा लागवडी
फूल, कीड यांचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक
Published on: 30 April 2021, 09:52 IST