News

महाराष्ट्रात सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी (For onion cultivation of the rabi season) लगबग बघायला मिळत आहे, राज्यातील नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी शेतकरी राजा प्रयत्नरत आहे, यावर्षी कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड करताना दिसत आहे. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा म्हणजे कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड (Summer onion cultivation) बघायला मिळत आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लागवड करताना एका भयाण संकटाला सामोरे जावे लागत आहे, हे संकट आहे मजूरटंचाईचे.

Updated on 02 January, 2022 1:25 PM IST

महाराष्ट्रात सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी (For onion cultivation of the rabi season) लगबग बघायला मिळत आहे, राज्यातील नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी शेतकरी राजा प्रयत्नरत आहे, यावर्षी कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने  जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड करताना दिसत आहे. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा म्हणजे कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड (Summer onion cultivation) बघायला मिळत आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लागवड करताना एका भयाण संकटाला सामोरे जावे लागत आहे, हे संकट आहे मजूरटंचाईचे

मजुरांअभावी कसमादे पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, मजुरांना अधिक ची मजुरी द्यावी लागत आहे. मागच्या वर्षीदोनशे रुपये रोज अशी रोजंदारी होती. मात्र, यात यावर्षी तब्बल शंभर रुपयांनी वाढ होऊन तीनशे रुपये रोज अशी रोजंदारी जिल्ह्यात विशेषता कसमादे परिसरात बघायला मिळत आहे. रोजंदारी पेक्षा अधिकचे पैसे देऊन देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (onion growers) कांदा लागवडीसाठी मजुर मिळत नाहीयेत. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकरी रात्रीपाळीतून कांदा लागवड करण्याला मजबूर झाले आहेत.

का निर्माण झाली मजूरटंचाई

कसमादे परिसरात एकाच वेळी शेतकऱ्यांची कांदा लागवड करण्याची लगबग सुरु झाली, यामुळे मजुरांची टंचाई (Labor shortage) निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची  वेळेत उन्हाळी कांदा लागवड व्हावी अशी आशा आहे, त्यासाठी मजुरांना एक्स्ट्रा मजुरी (Wages) देखील देण्यास शेतकरी राजी होताना दिसत आहेत, मात्र तरीदेखील मजूर कांदा लागवडीसाठी (For onion cultivation) मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधव रात्रीची कांदा लागवड करत आहेत. तसेच अनेक शेतकरी बांधव  स्वतः आपल्या कुटुंबासमवेत अगदी लहानग्या मुलांना सोबत घेऊन कांदा लागवड करताना दिसत आहेत.

काय आहे यावर समाधान?

मजूर टंचाई दूर करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे, अनेक कंपन्यांनी कांदा लागवड करण्यासाठी आधुनिक यंत्रांची (machinery for onion cultivation) निर्मिती केली आहे, अनेक आधुनिक यंत्र हे एक माणूस चालवू शकतो अशी देखील आहेत. म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लागवड करण्यासाठी या यंत्राचा उपयोग करणे गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी या यंत्राचा वापर केला तर मजूर टंचाई कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

English Summary: labor shortage for onion cultivation in nashik district but this is a solution for this
Published on: 02 January 2022, 01:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)