News

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना महा विकास आघाडी सरकारने सातत्याने विरोध केलेला होता. आता झालेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने नवीन कृषि विधेयक सभागृहात सादर केले. यामध्ये राज्य सरकारने तीन विधेयके सादर केलेली आहे ती कोणती जाणून घेऊ.

Updated on 07 July, 2021 7:49 AM IST

 केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना महा विकास आघाडी सरकारने सातत्याने विरोध केलेला होता. आता झालेल्या दोन दिवसीय  पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने नवीन कृषि विधेयक सभागृहात सादर केले. यामध्ये राज्य सरकारने तीन विधेयके सादर केलेली आहे ती कोणती जाणून घेऊ.

 राज्य सरकारची तीन विधेयके

  • शेतकरी( सक्षमीकरण आणि संरक्षण ) आश्वासित किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम,2020
  • अत्यावश्यक वस्तू( सुधारणा) अधिनियम 2020
  • शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार आणी सुविधा अधिनियम 2020

या केंद्र सरकारच्या तीनही कृषी उद्योगांमध्ये सुधारणा करून राज्य सरकारचे विधेयके मांडण्यात आले आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या सुधारित विधेयकात  अतिशय महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

  • शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार प्रोत्साहन आणि सुविधा अधिनियम 2020 –
  • जे व्यापारी शेतमालाचा व्यापार किंवा व्यवहार करतात अशा व्यापाऱ्यांसाठी सक्षम प्राधिकारी याकडून लायसन्स घेणे बंधनकारक असेल कारण मोठे भांडवलदार आणि कार्पोरेट रिटेलर्स तर्फे शेतकऱ्यांची फसवणूक व छळ होण्याची दाट शक्यता असू शकते.
  • जर शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला तर तो सोडवण्यासाठी नजीकच्या अपील अधिकार्‍याकडे अपील करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.
  • जे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक आणि छळवणूक करतील आणि तशा प्रकारचा गुन्हा संबंधित व्यापारी विरोधात सिद्ध झाला तर अशा व्यापाऱ्याला तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाची शिक्षा किंवा पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांचा छळ याची व्याख्या म्हणजे खरेदी-विक्रीच्या करारानुसार किंवा शेतकऱ्यांच्या मालाची पोच मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत पैसे दिले गेले नाही तर तो छळाचा गुन्हा म्हणून नोंदविला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे..
  • राज्य शासनाला राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे सदर कायद्यातील तरतुदींबाबत नियम करण्याचे अधिकार असतील अशी तरतूद करण्यात आली आहे.
    • शेतकरी( सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासित किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम,2020:
  • शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा तात्काळ करण्यासाठी सक्षम अथवा अपिलीय अधिकारी यांची व्याख्या करण्यात आली असून त्यानुसार केंद्रशासनाच्या कायद्यात असलेल्या उपविभागीय अधिकारी ऐवजी राज्यशासन ठरवेल अशा सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.
  • केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये किमान आधारभूत किमतीची तरतूद नाही. परंतु राज्य शासनाने केलेल्या सुधारणा मध्ये ती करण्यात आलेली आहे.
  • शेतकरी व करार करणारी कंपनी यांच्यात परस्पर संमतीने पिक विक्री किंवा खरेदी यासाठीचा करार किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीने दोन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येईल.
    • अत्यावश्यक वस्तू ( सुधारणा)अधिनियम,2020:
  • केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत युद्ध, दुष्काळ, असाधारण किंमत वाढ व गंभीर स्वरूपाचे नैसर्गिक आपत्ती अशा असाधारण परिस्थिती मध्येच कडधान्य, डाळी, बटाटा, कांदे, खाद्यतेल बिया व खाद्यतेल इत्यादींचे निर्माण करू शकणार आहे.
  • सदर वस्तूंचा साठा निर्बंध लावण्याबाबत असाधारण किंमतवाढ या एकमेव आधारावरच निर्णय घेण्यात येणार आहे.
  • यात राज्य शासनास कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. परंतु राज्य शासनाच्या सुधारणे मध्ये अशा जीवनावश्यक वस्तूंच्या साठा करण्यावर निर्बंध लावण्याचा अधिकार केंद्र शासनासह राज्य शासनाला असतील अशी सुधारणा राज्य शासनाकडून या विधेयकाद्वारे प्रस्तावित करण्यात आली आहे.
English Summary: krushi vidheyak maharashtra goverment
Published on: 07 July 2021, 07:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)