News

राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहीम एक जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

Updated on 24 June, 2021 1:30 PM IST

तसे पाहायला गेले तर कृषी संजीवनी मोहीम  ही एक जुलै पासून राबवली जाते. परंतु त्या काळापर्यंत खरीप पिकांची पेरणी आणि जमीन मशागतीचा महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन एक जुलैपूर्वी ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे  कृषिमंत्र्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत 21 जून पासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य कार्ड नुसार खतांचा संतुलित वापर  यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 या मोहिमेअंतर्गत 24 जून रोजी एक गावे कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवडीविषयी तंत्रज्ञान, कडधान्ये व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आज 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 29 जूनला रिसॉर्ट बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादनवाढीसाठी सहभाग, 30 जून ला प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकाची किड व रोग नियंत्रण व उपाय योजना या बाबतीत या मोहिमेअंतर्गत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

एक जुलैला म्हणजेच  कृषी दिनी या योजनेचा समारोप होणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करावे या बाबतच्या सूचना कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहेत.

English Summary: krushi sanjivani mohim
Published on: 24 June 2021, 01:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)