1. बातम्या

शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या उड्डाणासाठी आहे सरकारची किसान कृषी उडान योजना

किसान कृषी उडान योजनेची घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात केली होती. आता ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल हवाईमार्गे किंवा रेल्वेमार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेनेआणि कमी वेळातनेता येईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल लवकर खराब न होता अगदी वेळेवर बाजारपेठेत पोच केला जाईल व त्या आधारे शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा घडून येईल व शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल हेया योजनेचे उद्दिष्ट आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
krushi udaan yojana

krushi udaan yojana

 किसान कृषी उडान योजनेची घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात केली होती. आता ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल हवाईमार्गे किंवा रेल्वेमार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेनेआणि कमी वेळातनेता येईल.  या योजनेमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल लवकर खराब न होता अगदी वेळेवर बाजारपेठेत पोच केला जाईल व त्या आधारे शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीतसुधारणा घडून येईल व शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल हेया योजनेचेउद्दिष्ट आहे.

 या योजनेच्या अंमलबजावणी राज्य व केंद्र सरकार द्वारे एअरलाइन्स ना दिली जाईल. या योजनेमध्ये कृषी  रेल्वेला सुद्धा जोडले गेले आहे. विमान मार्गे आणि रेल मार्गे शेतमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमीवेळातनेला जाईल तसेच दूध, दही, मांस, मासे अशा लवकर खराब होणारे पदार्थ याद्वारे अगदी कमीवेळेत बाजारपेठेत पोहोचवले जातील.कृषी उडान योजनेमध्येनॅशनल आणि इण्टरनॅशनल फ्लाईट चासमावेश करण्यात आला आहे.

 या योजनेत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासीअसावा.
  • महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा शेतकरी असावा.
  • अर्जदाराचे आधार कार्ड आवश्यक
  • अर्जदाराला शेतीच्या संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील.
  • रेशन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाच्या संबंधित कागदपत्रे

कृषी उडान योजनेत अर्ज कसा करावा?

  • देशातील कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सगळ्यात अगोदर gov.inसंकेतस्थळावर जावे.
  • नंतर या संकेतस्थळाच्या होम पेजवर तुम्हाला कृषी उडान योजना हा पर्याय दिसेल.
  • नंतर कृषी उडान योजना या पर्यायाला क्लिक करून तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होते.
  • या पेजवर  कृषी उडान योजनेचा अर्ज साठीचा फॉर्म ओपन होईल.
  • या फार्ममध्ये तुमचे नाव, तुमचा पत्ता,आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक पिकांसंबंधित  माहिती भरावी.
  • नंतर हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर सबमिट करावे
  • एवढी प्रक्रिया केल्यानंतर कृषी उडान योजनेसाठी चा तुमचा अर्ज पूर्ण होईल

 

  • कृषी उडान योजनेच्या पोर्टल मध्ये लॉगिन कसे करावे?
  • सगळ्यात आगोदर अर्जदाराने वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळावर जावे.
  • त्यानंतर स्क्रीनवर ओपन झालेले होम पेज येईल.
  • या होमपेज या अगदी खालच्या बाजूला एक लोगिन चा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करावे.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होते.
  • या नवीन ओपन झालेल्या पेजवर तुमचा ईमेल आयडी पासवर्ड नोंदवावा लागतो. त्यानंतर खाली एक कॅपच्या कोड दिला जाईल तो टाकावा आणिलॉगिनबटनावर क्लिक करावे.

 

 

English Summary: krishi udaan yojana of central gov for farmer Published on: 18 September 2021, 03:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters