News

शेतात काबाड कष्ट करुन शेतकरी आपल्या शेतात पिके पिकवत असतो. परंतु जेव्हा तो बाजारा आपला शेतमाल विक्रीसाठी नेत असतो , तेव्हा त्याला अडत्यांच्या आधार घेऊन आपला माल विक्री करावा लागतो. त्यामुळे त्याला त्याच्या शेतमालाची हवी तितकी किंमत मिळत नाही.

Updated on 30 September, 2020 11:50 AM IST


शेतात काबाड कष्ट करुन शेतकरी आपल्या शेतात पिके पिकवत असतो. परंतु जेव्हा तो बाजारा आपला शेतमाल विक्रीसाठी नेत असतो , तेव्हा त्याला अडत्यांच्या आधार घेऊन आपला माल विक्री करावा लागतो.  त्यामुळे त्याला त्याच्या शेतमालाची हवी तितकी किंमत मिळत नाही. कष्टाचे योग्य फळ बळीराजाच्या पदरात पडत नाही. ही समस्या लक्षात घेत कृषी जागरण मराठीने आपली २४ वर्षाची सेवा पुर्ण केल्यानंतर  जून महिन्यापासून फार्मर द ब्रॅण्ड हे अभियान सुरू केले. यात अनेक राज्यातील प्रगतीशील शेतकरी येत असून आपल्या शेतमालाची शेतीतील यशाबद्दल माहिती देत आहे.  दरम्यान या अभियानातून साधरण २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या ब्रॅण्डची माहिती दिली आहे. 

कृषी जागरणच्या या फार्मर द बॅण्ड या अभियानाचा फायदा घेत या शेतकऱ्यांनी आपला ब्रॅण्ड विकसित करत पिकांची विक्री वाढवली आहे. दरम्यान यातील दहा शेतकरी ज्यांच्याकडे आपला स्वताचा एक ब्रॅण्ड आहे, आणि कृषी जागरणच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांना चांगल्या किंमतीवर विकत आहे.  ते शेतकरी ४ ऑक्टोबर २०२० ला कृषी जागरणच्या फेसबुक पेज https://www.facebook.com/krishi.jagran वर लाईव्ह येत देशातील शेतकऱ्यांना संबोधित करतील.  आणि सांगतील की, आपण कशाप्रकारे आपला ब्रॅण्ड विकसित केला. आपल्या शेतमालाची विक्री कशाप्रकारे विक्री केली, दर कसा मिळवला याची सर्व माहिती हे शेतकरी देणार आहेत.

क्रमांक

शेतकऱ्याचे नाव 

ब्रॅण्डचे नाव 

राज्याचे नाव 

1.

अजिंक्य हांगे

टू ब्रदर्स ऑर्गेनिक फॉर्म्स

पुणे, महाराष्ट्र

2.

यश जयंतीभाई पाढियार

ब्रॅण्ड: हीर ऑर्गेनिक्स

बनासकांठा, गुजरात

3.

कंवल सिंह चौहान

इंटीग्रेटेड यूनिट फॉर मशरूम डेवलपमेंट

सोनीपत, हरियाणा

4.

अरबिंद सिंह धूत

सिंह किचन गार्डन

पंजाब

5.

आनंद मिश्रा

लेमन मॅन रायबरेली

रायबरेली, उत्तर प्रदेश

6.

राजा मणिकम

एच-डीआईए फूड्स

तमिलनाडु

7.

सत्यनहल्ली कुमारस्वामी

ऑर्गेनिक वेजिटेबल्स (अपने नाम से)

मंड्या; कर्नाटक

8.

शाजी जीआर

ब्रॅण्ड: चक्कमुक्कू, को-ऑर्डिनेटर जैकफ्रूट प्रमोशन कंसोर्टियम

केरळ

9.

बिराधर वीर शेट्टी पाटिल

मिलेट फ़ार्मिंग (तेलंगाना का मिलेट मैन)

हैदराबाद, तेलंगाणा

10.

अरुण मंडल

मंडल्स पाइनएप्पल

दार्जिलिंग, पश्चिम बंगाल


जो किसान 4 अक्टूबर को इसका लाभ उठाना चाहते हैं वो

जे शेतकरी ४ ऑक्टोबरला या अभियानाचा लाभ घेणार असतील तर त्यांनी  (https://bit.ly/3hlHzSY) या लिंकवर क्लिक करुन आपली नोंदणी करावी.

English Summary: Krishi Jagran will celebrate #ftb monthly mahotsav on October 4
Published on: 30 September 2020, 11:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)