सध्या कोरोनाच्या काळात कृषी क्षेत्रावर मोठी जबाबदारी आली आहे. देशाची जीडीपी उभारण्यासाठी कृषी क्षेत्रावर मोठी भुमिका असणार आहे. पण हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दुप्पट होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचे ब्रँडिंग करावे लागेल. यासाठी कृषी जागरण मराठी आपल्यालासाठी एक मोठी संधी देत आहे. कृषी जागरण मराठी आपल्याला आपल्या शेतमालाची ब्रँडिंग करण्यास मदत करणार आहे.
दरम्यान कृषी जागरण मराठीने जून महिन्यापासून फार्मर द ब्रँड चा अभियान सुरू केले. या अभियानातून शेकतरी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकत शकत आहेत. यामुळे ग्राहक आणि शेतकरी याचा थेट व्यवहार होत असल्याने मधील मध्यस्थींचा काही संबंध नसल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा होत असतो. दरम्यान विविध राज्यातील दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी जागरणच्या माध्यमातून आपला ब्रँड देशासमोर आणला आहे. दरम्यान १० निवडक शेतकऱ्यांचा शेतमालची ब्रँडिग केल्यानंतर त्यांच्या शेतमालाला देशभरातून आणि जगभरात मागणी होत आहे.
दरम्यान हे शेतकरी ५ सप्टेंबर २०२० च्या कृषी जागरणच्या फेसबुक पेज https://www.facebook.com/krishi.jagran
वरुन देशातील एक हजार शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यातून ते शेतकऱ्यांना आपला शेतमालाचा कसा ब्रँड करायाचा मार्केटिंग कशी करायची याची माहिती देणार आहेत.
भारत भूषण त्यागी - पद्मश्री अवार्ड से सम्मानित- 2019
भारत भूषण त्यागी - पद्मश्री पुरस्कारने सन्मानित २०१९
कंवल सिंह चौहान - पद्मश्री पुरस्तार सन्मानित २०१९
नवनाथ मल्हारी कास्पेट - कृषी भूषण पुरस्कार सन्मानित
देवेश पटेल - ऑर्गेनिक इंडिया धरतीमित्र पुरस्कार २०१८
अजिंक्य हांगे -२०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारकडून सर्वक्षेष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त
अविनाश सिंह दांगी - आर्गेनिक इंडिया हलधर
भारतमध्ये मुख्य १०
मंजुळा आणि पार्थिबन - राष्ट्रीय पोषण पुरस्कार २०१८.
प्रीथा प्रथाब
राय नवनीत शंकर सूद
समीर बोरदोलोई हे शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांना ५ सप्टेंबरला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते शेतकरी https://bit.ly/3hlHzSY लिंकवर क्लिक करुन नोंदणी करू शकतात.
Published on: 28 August 2020, 07:55 IST