News

कृषीव्यवस्थेत बदल होण्यास अजून बराच वाव आहे.भारतीय कृषी व्यवस्थेबद्दल बोलायचे झाले तर तांत्रिकदृष्ट्या आपण अजूनही मागे आहोत.तरीही तंत्रज्ञान आजच्या काळाचीच नव्हे तर आपल्या उद्याची ही मागणी आहे.

Updated on 08 June, 2022 1:31 PM IST

कृषीव्यवस्थेत बदल होण्यास अजून बराच वाव आहे.भारतीय कृषी व्यवस्थेबद्दल बोलायचे झाले तर तांत्रिकदृष्ट्या आपण अजूनही मागे आहोत.तरीही तंत्रज्ञान आजच्या काळाचीच नव्हे तर आपल्या उद्याची ही मागणी आहे.

अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रात होत असलेले बदल सुनिश्चित करणे आपली जबाबदारी आहे.इजरायल,अमेरिका आणि चीन सह इतर देशातील शेतकरी आज तंत्रज्ञान आणि इतर माध्यमांच्या सहाय्याने यशस्वी शेती करून पुढे जात आहेत.

या भागात आज कृषी जागरणने पुन्हा एकदा ऐतिहासिक पाऊल टाकत IGATT. org च्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली आहे.

IGATT म्हणजे नेमके काय?

ही एक यूएसए आधारित संस्था आहे.ज्याचे उद्दिष्ट जगाला प्रगतीच्या योग्य मार्गावर आणने हे आहे.निरोगी जीवनशैली प्रदान करण्यासाठी शाश्वत शेती,पाणी आणि ऊर्जा तसेच पौष्टिक अन्न नवकल्पना भोवती सशक्त आणि उद्योजक समुदाय तयार करते.

नक्की वाचा:Farm Machinary: शेतकरी दादांनो! जमीन उंच-सखल आणि डोंगराळ भागात आहे, तर ही यंत्र पडतील उपयोगी, वाचतील कष्ट

IGATT. org ज्या विशिष्ट कार्याबद्दल खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या माध्यमातून शिक्षण,तंत्रज्ञान हस्तांतरण आणि एंटरप्राइज बिल्डिंग साठी बहू अनुशासनात्मक भागीदारी तयार करते आणि नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान, कार्यक्षम  सिंचन आणि ऊर्जा पर्याय विकसित करते आणि संशोधन,

शिक्षण आणि नवकल्पना याद्वारे ज्ञान तयार करते आणि ते प्रसारित करून लागू करते.  हाच विचार पुढे नेण्यासाठी आज IGATT. org चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. अजय कुमार झा यांनी शेतकरी आणि स्वतःच नाते आणखी सुधारण्यासाठी कृषी जागरण ची निवड केली.

जेणेकरून येणाऱ्या काळात दोघे एकत्र येऊ शकतो यासाठी काम करतील. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, डॉ. अजय कुमार झा यांनी नेपाळ आणि अफगाणिस्तान साठी 20 दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त किमतीच्या बहूअनुशासनात्मक, बहु एजन्सी आणि बाह्य अर्थसहाय्यित जागतिक शैक्षणिक कार्यक्रमाचे  नेतृत्व आणि व्यवस्थापन केले आहे.

नक्की वाचा:IoTech World Avigation कंपनीने लॉन्च केला सर्वोत्तम बाइक ड्रोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

 त्यांनी पीएचडी दिल्ली विद्यापीठ, भारतातून जैवतंत्रज्ञानाचा तसेच कोलेरॅडो ऑफ स्टेट यूनिवर्सिटी मधून एम बी ए पूर्ण केले आहे. त्यांनी युनायटेड स्टेट्स, इजरायल, भारत, अफगाणिस्तान आणि नेपाळ साठी नाविन्यपूर्ण शिक्षण, शाश्वत उपक्रम आणि योग्य तंत्रज्ञान हस्तांतरण विकसित केले असून स्वतःचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

डॉ.अजय कुमार झा यांनी त्यांच्या अनुभवाने आणि उद्देशाने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कृषी जागरण सोबत सामंजस्य करार केला आहे. याप्रसंगी एमसी डॉमनिक, संस्थापक आणि मुख्य संपादक, कृषी जागरण आणि एग्रीकल्चर वर्ड यांनी डॉ.

अजय कुमार झा यांचे आभार मानले की ते आणि त्यांचे कुटुंब  IGATT. org सोबत टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यास तयार आहेत आणि आशा आहे की ते विश्वास ठेवतात. त्याचा  फायदा शेतकरी वर्गाला नक्कीच होणार आहे.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! 'मागेल त्याला शेततळे' योजनेत 50 हजार रुपये अनुदानात 50 टक्के वाढ

 या सामंजस्य कराराच्या मुख्य उद्देश

1- सामंजस्य कराराच्या मुख्य उद्देश शेतकरी समुदायाचे फायद्यासाठी एकत्रित पणे काम करण्यासाठी विविध कार्यक्रम/ वेबिनार आणि प्रदर्शने तसेच चर्चासत्र आयोजित करणे असा आहे.

2-एकत्रितपणे माहितीची देवाण-घेवाण केली जाईल, जेणेकरून जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.

3-या सामंजस्य करारांतर्गत,भारतीय शेतकरी समुदायातील कृषी जागरणाच्या पोहोचचा लाभ घेऊन शेतकर्‍यांना शिक्षित केले जाईल.

4- उद्योजकीय परिसंस्था विकसित करण्यासाठी आणि भारतीय शेतीचे कृषी व्यवसायात रुपांतर करण्याचे प्रयत्न

5- कृषी जागरण च्या मदतीने, IGATT.org शेतकऱ्यांसाठी डिजिटल माध्यमाद्वारे  शेतकऱ्यांसाठी एकत्रपणे प्रशिक्षण सत्र आयोजित करणार आहे.

English Summary: krishi jagran contract with IGATT. org for developmet in agriculture sector
Published on: 08 June 2022, 01:31 IST