बदलत्या काळाबरोबर शेती (farming) मध्ये सुद्धा अनेक अमुलाग्र बदल होत आहेत. वाढत्या यांत्रिकीकारणामुळे कमी वेळेत उत्पन्न वाढले आणि वेळेची बचत झाली तसेच युरिया, सुफला अश्या वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये वाढला.तसेच कमी वेळेत येणाऱ्या हायब्रीड पिकांची लागवड होऊ लागली. त्यामुळे मानवाला(human) सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना बळी पडावे लागत आहे.या मधून उत्पादनाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली परंतु मानवाचे आरोग्य हे धोक्यात आले आहे. यासाठी आजकाल जास्तीत जास्त लोक सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. सेंद्रिय म्हणजे थोडक्यात देशी ज्या मध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरली नाहीत अशी पिके.
सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही आहे:
तुम्हाला माहितेय का? झिरो बजेट सेंद्रिय शेती ही मूळ संकल्पना ही आपल्या महाराष्ट्र राज्याची आहे. सेंद्रिय शेतीची सुरवात ही विदर्भातील बेलोरा या गावत राहणाऱ्या सुभाष पालेकर या व्यक्तीने करायला सुरुवात केली.आज च्या काळात सेंद्रिय शेती ही फक्त नावालाच शिल्लक राहिली आहे. हव्यासाच्या पोटी शेतात रासायनिक खतांचा वापर करून जास्त उत्पादन मिळवणे एवढाच उद्देश शेतीमधून घेतला जात आहे. परंतु हे आपल्याच आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणून सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही आहे.या सर्वातून जर तुम्हाला निरोगी आणि आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही.झिरो बजेट नैसर्गिक शेती ची ओळख करून देणारे सुभाष पालेकर हे विदर्भातील बेलोरे गावचे सुपुत्र. 1972 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांबरोबर रासायनिक शेती करण्यास सुरुवात केली.त्यातून त्यांना उत्पन्न ही मोठ्या प्रमाणात मिळत होते. परंतु रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा कस हा कमी होत चालला होता. हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यावर 3 वर्ष अभ्यास केला आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीला सुरवात केली.
नैसर्गिक शेती चे महत्व:-
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते परंतु रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन करणे म्हणजे विषयुक्त अन्नाचा पुरवठा करणे. हे जर का आपल्याला बंद करायचे असेल तर पूर्णपणे नैसर्गिक शेती करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नाही. नैसर्गिक शेती मध्ये पिकवले अन्न हे विषमुक्त असते तसेच हे आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त असते. सेंद्रिय शेती करून पिकवलेल्या पालेभाज्या फळभाज्या यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.जर का एकदा लोकांना सेंद्रिय शेती मधील पिकलेल्या अन्नाची सवय झाली तर पुन्हा कधीच कोणती व्यक्ती रासायनिक खताचा वापर करणार नाही असा विश्वास सुभाष पालेकर यांना आहे.
नैसर्गिक शेती करण्यासाठी फक्त एका गाईची आवश्यकता आहे असे सुभाष पालेकर त्यांनी सांगितले आहे. 3 एकर क्षेत्र जमिनीची जोपासना करण्यासाठी फक्त एका देशी गाईचे गोमूत्र आणि शेणखत एवढेच आवश्यक असल्याचे सुभाष पालेकर यांनी सांगितले आहे.जर का प्रत्येक शेतकऱ्यांनी ‘झिरो बजेट शेती’ करायला सुरुवात केली तर रासायनिक खतांत होणार खर्च हा पूर्णपणे कमी होणार आहे. तसेच बाजारात सेंद्रिय पिकाला भाव सुद्धा चांगला मिळतो आणि ग्राहक मागणी सुदधा झपाट्याने वाढत आहे.
Published on: 14 October 2021, 03:05 IST