अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे मात्र भूजल पातळी वाढल्यामुळे रब्बीसाठी पाणीसाठा झालेला आहे. रब्बी च्या जवळपास निम्या क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत.सर्वकाही चांगलं चालले होते तोपर्यंत महावितरण कंपनीने वीजबिल वसुली सुरू केली. वीजबिल वसुली तर सुरूच आहे पण २२ नोव्हेंबर पर्यंत कृषिपंपाचे वीजबिल नाही दिले तर कनेक्शन बंद केले जाणार आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणी:-
मागील काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे आणि त्यात कृषी पंपाच्या वीजबिल वसुली राबवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक संकटाची लाटच उसळली आहे. पीक नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत आणि पैसे नसल्याने बिल कुठून देणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे आता पिकांना पाणी द्यायची गरज पडलेली आहे आणि त्यात आता वीज नसेल त्यामुळे शेतकड्यानं अडचणी आलेल्या आहेत.
रब्बी हंगामाच्या तोंडावरच वसुली मोहीम:-
रब्बी हंगामातील पिकांची काळजी ही पाण्यावर होते मात्र त्यास लागते ती वीज. मात्र आता पाणी द्यायला वीज च राहिली नसल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण लक्षात घेताच महावितरण वर्गाने वीजबिल मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी जर २२ नोव्हेंबर पर्यंत कृषिपंप वीजबिल अदा केले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल असे सांगण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची १ हजार २७८ कोटी रुपयांची थकबाकी:-
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे १ हजार २७८ कोटी रुपये थकबाकी आहे असे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले आहे. या वाढत्या थकबाकीमुळे महावितरण विभागाकडे दुसरा पर्याय नाही त्यामुळे वीजबिल अदा करण्याची तारीख त्यांनी दिली असून जर बिल नाही केले तर वीजपुरवठा खंडित केला जाईल असे सांगण्यात आले आहे.
Published on: 19 November 2021, 06:31 IST