१.द्राक्ष निर्यातशुल्कात वाढ;उत्पादक शेतकऱ्यांची चिंतेत वाढ
२.भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार
३.राज्यात हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता
४.सरकार लोककल्याणकारी निर्णय घेत आहे-एकनाथ शिंदे
५.लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नूतनीकरण होणार; कृषिमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
१.नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ आता द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. भारतातून बांग्लादेशमध्ये द्राक्ष निर्यात केली जाते. पण आता बांग्लादेशने या निर्यातीवर देखील १०४ रुपये प्रतिकिलोचे आयातशुल्क लावले आहे. यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या निर्यात खर्च वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसंच बांग्लादेशाने द्राक्षावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने निफाड, दिंडोरी आणि सांगलीमधून द्राक्षाची निर्यात घटली आहे. द्राक्ष उत्पादकांचा निर्यात खर्च वाढल्यमुळे शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. जेथे शेतकऱ्यांना किलोमागे १०० रुपये मिळत होते. तेथे आता त्यांना ७० रुपये मिळत आहेत. यामुळे कंटेनर वाहतुकीसाठी सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली आहे.
२.सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्रातील निमखारे मत्स्यशेती विकासासाठी भौगोलिक सर्वेक्षण प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मत्स्य व्यवसाय संदर्भात काम करण्याऱ्या संस्थांसोबत सामंजस्य करारही करण्यात आला.मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, सध्या आपल्या राज्याचा सागरी मत्स्य उत्पादनामध्ये देशात ६ वा क्रमांक तर भूजल मत्स्य उत्पादनामध्ये १७ वा क्रमांक आहे.ते बोलतांना म्हणालेत की पूर्वी दुर्लक्षित असलेला हा विभाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विभागाचा दर्जा देऊन ३ हजार कोटी रुपयांचा निधी ३० हजार कोटी रुपयांपर्यंत नेला. त्यामुळे या क्षेत्रात मूलभूत काम होण्याची गरज आहे अस मत त्यांनी व्यक्त केल. मत्स्यशेती संदर्भात विविध संशोधन संस्थांमध्ये होत असते. ते संशोधन मच्छिमार आणि नागरिकांपर्यंत पोहोचले. तरच त्या संशोधनाचा खऱ्या अर्थाने लाभ सर्वांना होऊ शकेल असेही ते म्हणालेत.
३.राज्यात गारठा कमी होऊ लागला आहे.अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पार गेला आहे.थंडीपासून काहीसा दिलासा आता मिळाला आहे हे असतानाच पावसाने अडचणीत वाढ केली आहे. थंड वाऱ्याने पुन्हा लोकांना थरकाप उडवायला सुरुवात केली आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागात एक नवीन विक्षोभ निर्माण होत आहे. त्यामुळे पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. IMD च्या हवामान बद्रा अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये पाऊस पडणार आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.आज पंजाब, हरियाना, चंदीगड, उत्तराखंड, राजस्थानमध्ये किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
४.मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महासंघाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे त्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील. महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेत.सरकार आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावली की विकास वेगाने होतो, याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना सरकार राबवत आहे, अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि त्याचा लाभ जनतेला देण्याचे काम प्रशासन करत आहे.असेही ते म्हणालेत.
५.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथील अडचणी दूर करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत धनंजय मुंडे बोलतांना म्हणालेत. लातूर मधील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा त्यासोबतच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेत. .वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही शासकीय कृषी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाविद्यालय नसल्याने नवीन महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.असेही मंत्री मुंडे म्हणालेत.या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्याचे निर्देश यावेळी मंत्री मुंडे यांनी दिले
Published on: 08 February 2024, 03:18 IST