लॉकडाऊनच्या काळात गहूची कापणी झाल्यानंतर गव्हाला बाजारात नेण्यासाठी मार्ग सोपा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच धर्तीवर केंद्रीय कृषीमंत्री आणि आणि शेतकरी कल्याण मंत्री (Union Agriculture Minister) नरेंद्र सिंह तोमर यांनी या हे किसान रथ ऐप (Kisan Rath Mobile App) लॉन्च केले आहे. यामुळे शेतकरी आणि बाजार मंडई दोन्ही बाजू जोडल्या गेल्या आहेत. या ऐपचा उपयोग करुन तुम्ही घरी बसून ट्रक, टॅक्टर, आणि इतर कृषीसाठी लागणारी साहित्य मागवू शकता.
अनेक विशेषता असलेल्या या ऐपमध्ये हायरिंग सेंटरही आहेत. साधरण १४ हजारपेक्षा अधिक हायरिंग सेंटर या ऐपवर आहेत. या ऐपद्वारे आपण शेतीसाठी लागणारी इतर अवजारे मागवू शकता. यात २० हजारपेक्षा अधिक ट्रक्टर रजिस्टर्ड आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह ट्रांन्सपोर्टला काम मिळेल. या ऐपमुळे दोन्ही बाजूंना काम मिळणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ, नये यासाठी सरकारकडून यावर नियंत्रणही ठेवले जाईल.
शेती उत्पादनांची वाहतूक करणे हा पुरवठा साखळीचा आवश्यक आणि अपरिहार्य घटक आहे. लॉकडाऊनमुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत “किसान रथ”, शेतकरी, गोदामे, एफपीओ, एपीएमसी मंडळे आणि राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य खरेदीदारांमधील सहज आणि अखंड पुरवठा साखळी सुनिश्चित करेल. वेळेवर वाहतूक सुविधा मिळाल्यामुळे अन्नाची नासाडी कमी होईल. नाशिवंत वस्तुंना चांगला भाव मिळण्यासही हे उपयुक्त ठरेल. या ऐपची विशेषता म्हणजे हे ऐप इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी. पंजाबी, कन्नड, आणि तेलुगू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
कसा उपयोग करणार या किसान रथ मोबाईल ऐपचा (kisan RAth Mobile App)
- डाऊनलोड झाल्यानंतर आपल्या भाषेची निवड करावी.
- त्यानंतर आपले नाव, मोबाईल नंबर आणि आधार नंबर ही माहिती त्यात भऱावी.
- जर तुम्ही व्यापारी आहात तर आपल्याला कंपनीचे नाव, आपले नाव आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक पासवर्ड येईल. त्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल.
- यानंतर शेतकरी आपल्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रक आणि टॅक्टरची ऑनलाईन बुकिंग करु शकतील.
- वाहतुकीसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याची प्रक्रिया
- ऐप उघडा, त्यात लॉगिन करा आणि सविस्तर माहिती भरा.
- आता कामाची तारीख आणि माहितीची निवड करा.
- यात आपण आपल्या गरजेच्या विषयी माहिती देऊ शकतात.
- त्यानंतर संबंधित सेवा देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करून त्यांच्याकडून उत्तर मिळवा. याप्रमाणे आपण वाहतुकीच्या व्यवहाराला पुर्ण रुप दिले जाईल. किसान रथ मोबाईल ऐप एंड्रॉयड स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येईल. यासाठी गुगल प्ले - स्टोअरमध्ये या किसान रथ ऐपच्या शोध घ्या आणि डाऊनलोड करा.
Published on: 20 April 2020, 02:10 IST