मसाले स्वयंपाकाची चव वाढवतात त्याचबरोबर यामध्ये विविध औषधी गुणही आढळून येतात. भारतामध्ये मसाल्यांचा उपयोग पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. मसाल्यातील औषधी गुणांचा उल्लेख आयुर्वेदामध्येही भरपूर करण्यात आला आहे. भारतीय स्वयंपाकघरात तमालपत्राचा तेजपत्ता उपयोग मसाला स्वरुपात केला जातो. तमालपत्राची तेजपत्ता शेती प्रामुख्याने कर्नाटक, बिहार, केरळमध्ये केली जाते. परंतु पुर्ण देशभरात तमालपत्राचा उपयोग केला जातो. मालपत्राला दक्षिण भारतात तेजपान म्हणतात. नेपाळ आणि हिंदीमध्ये तेजपत्ता, आसाममध्ये तेज पत, इंग्रजीमध्ये बे लीफ, तर संस्कृत आणि मराठीत तमालपत्र असे संबोधले जाते. याचे वानस्पतिक नाव सिनॅमोमम तमाला असे आहे. आज या तमालपत्राच्या शेतीविषय़ी माहिती घेणार आहोत. पण लक्षात असू याची शेती आपल्या राज्यात केली जात नाही. या शेतीसाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून ३० टक्के अनुदान दिले जाते.
अशी केली जाते तयारी
तमालपत्राच्या लागवडीसाठी मातीचे पीएच मूल्य ६ ते ८ दरम्यान असावे. रोपे लावण्यापूर्वी माती नांगरून तण स्वच्छ करावे. कंपोस्ट बनवण्यासाठी आपण सेंद्रिय उत्पादने वापरू शकता. यानंतर, रोपांमध्ये ४ ते ६ मीटर अंतर ठेवून लावावे.
तमालपत्राची सुरक्षा
दंव पासून तमालपत्र संरक्षण करणे आवश्यक आहे. यासह, मुसळधार पावसापासून त्यांचेही संरक्षण केले पाहिजे.या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अधिक होत असतो. यामुळे काही कालावधी दरम्यान या पिकांवर नींबाच्या तेलाची फरवाणी करावी. वेळेनुसार याची छाटणीपण केली हवी.
तमाल पानांची मागणी
तमालपत्र खाण्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत, त्यात आढळणारे जीवनसत्त्वे अ आणि सी शरीरासाठी फायदेशीर आहेत. इतकेच नाही तर त्यात फॉलिक अॅसिडही आढळते, जे पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.
Published on: 06 May 2020, 03:36 IST