News

भारत हा कृषिप्रधान देश आहे प्रामुख्याने येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. येथील शेतकरी वर्षात दोन हंगामात पीक घेत असतात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. रब्बी आणि खरीप हंगामात सुद्धा वेगवेगळी पिके घेतली जातात.

Updated on 30 September, 2022 4:52 PM IST


 

भारत हा कृषिप्रधान देश आहे प्रामुख्याने येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. येथील शेतकरी वर्षात दोन हंगामात पीक घेत असतात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. रब्बी आणि खरीप हंगामात सुद्धा वेगवेगळी पिके घेतली जातात.

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. तसेच करडई ला तेलबिया म्हणून सुद्धा ओळखले जाते. या पिकाचे वैशिष्ठ्य म्हणजे अत्यंत कमी पाण्यावर हे पीक अधिक चांगले येते आणि यातून उत्पन्न सुद्धा चांगले मिळत आहे. जर ऐनवेळी या पिकाला पाणी भेटले नाही तरी या या पिकाच्या उत्पन्नावर थोडासुद्धा परिणाम होत नाही. करडई च्या झाडाचा प्रत्येक भाग हा उपयोगी ठरतो. करडई चा वापर सुगंधी तेलनिर्मिती, कपड्यांना दिल्या जाणाऱ्या रंगाच्या निर्मिती साठी केला जातो. तसेच करडई आरोग्यदायी वनस्पती म्हणून सुद्धा ओळखले जाते करडई चे तेल हृदयासंबंधीचे आजार टाळण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

हेही वाचा:-हजारो आजरांवर आहे हे गुणकारी फळ, फायदे वाचून विश्वास बसणार नाही.

 

करडई लागवडीसाठी उपयक्त जमीन:-
करडई च्या लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रतीची जमीन निवडावी तसेच ज्या जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होईल अश्या जमिनीत करडई ची लागवड करावी.

करडई कधी पेरावी:-
करडई च्या पेरणी ला सुरुवात ही सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवडा या कालावधी मध्ये पूर्ण करावी

बियाणे:-
करडई च्या लागवडीसाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पेरणीसाठी आवश्यक असतात.

हेही वाचा:-तुळशीच्या पानात आहेत एवढे आरोग्यदायी गुणधर्म, वाचून थक्क व्हाल.

 

 

पेरणीचे अंतर:-
कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळींत ४५ सेंमी व झाडांमध्ये २० सेंमी अंतर ठेवावे.

सुधारित बियाणांची आवश्यकता:-

कमी वेळात जास्त पीक मिळवण्यासाठी सुधारित 6बियाणांची लागवड करणे खूप गरजेचे आहे.या मध्ये पी.बी.एन.एस, नारी 6, फुले कुसुमा,पूर्णा या सुधारित बियाणांची आवश्यकता असते.

खतव्यवस्थापन:-
कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र म्हणजेच 100 ते 110 किलो युरिया चा वापर करावा तसेच २५ किलो स्फुरद (१५६ किलो एस.एस.पी.) तसेच बागायती जमिनितील करडई पिकास ६
60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.

English Summary: Know, sorghum cultivation techniques and management, read in detail.
Published on: 30 September 2022, 04:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)