मधमाशी केंद्राचे महत्व केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला वर्षाच्या सुरुवातीस लक्षात आले. खादी व ग्रामउद्योग मंडळामार्फत राज्यात मधकेंद्र योजना राबविण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जोडव्यवसाय व बेरोजगारी लोकांच्या हाताला काम भेटणार आहे. इच्छुक लोकांनी ग्रामउदयोग मंडळाकडे अर्ज करावा जे की त्यांना मधमाशापालनाचे प्रशिक्षण महाबळेश्वर येथे देण्यात येणार आहे.
व्यवसयाची संधी अन् अनुदानाचा लाभही...
केंद्र सरकारने मधमाशीपालनाला हिरवा कंदील दाखवतानाचा हनी मिशन अभियानास मंजुरी दिली तसेच आता राज्य सरकारने सुद्धा असा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्गाला जोडव्यवसाय करण्यास सुरुवात होईल तसेच तरुण वर्गाच्या हाताला काम सुद्धा भेटणार आहे. मध संचालयाने महाबळेश्वरमध्ये हमीभावाने प्रकल्प खरेदी केला असल्याने मधाची खरेदी आता हमीभावाने केली जाणार आहे. जेव्हा पूर्ण प्रशिक्षण पूर्ण होईल त्याचवेळी मधकेंद्र उभा करता येणार आहे. जर त्यावेळी काही अडीच आली तर 020-25811859 या नंबर वर किंवा ग्रामउद्योग अधिकारी कार्यालयाला संपर्क साधावा.
काय आहेत अटी?
मधमाशी पालन करायचे असेल तर तो अर्जदार १० वी पास व त्याचे वय २१ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. फक्त शेतीच्या जोरावर काही करता येणार नाही म्हणून शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यामध्येच ही एक योजना असून याचा लाभ शेतकरी वर्गाला तसेच तरुणांना घेता येणार आहे. जो अर्जदार आहे त्याच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबातील एका तरी व्यक्तीच्या नावावर एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादनबाबत प्रशिक्षण घेण्यासाठी तेवढ्या प्रमाणत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मधपेट्या तसेच इतर साहित्यासाठी ५० टक्के रक्कम प्रशिक्षण घेण्यापूर्वी च भरावी लागणार आहे.
प्रशिक्षणानंतर 50 टक्के अनुदान...
पूर्ण प्रशिक्षण तसेच त्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर मधमाशीपालन उभा करता येणार आहे. हा उदयोग करण्यासाठी ग्रामदयोग मंडळाकडून एकूण ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे तर ५० टक्के रक्कम त्या उमेदवाराला द्यावी लागणार आहे.
Published on: 22 December 2021, 05:54 IST