आजकालच्या काळात विना यंत्र शेती करणे कठीण आहे. यंत्रांनी शेतकऱ्यांच्या शेती विषयक कामांना सहज आणि सोपे बनवले आहे. तसेच अधिक उत्पन्न मिळवून जास्तीचा नफा मिळण्यामध्ये या यंत्रांची भूमिका महत्त्वाची आहे.
अगोदर ज्या कामांना करायला महिने लागायचे आता ते काम केवळ यंत्राच्या साह्याने काही तासात करता येते.
हिमाचल प्रदेश सरकारने जर्मनीच्या उद्यान आणि वाणिज्यिक विश्वविद्यालय नौणीने 2.6 कोटीमध्ये अल्ट्रा मायक्रोटॉम टेस्टिंग मशीन बसवले आहे. या मशीन चे खास वैशिष्ट्य म्हणजे या मशिनच्या साहाय्याने केवळ एक तासाच्या आत पिकांमध्ये आणि भाजीपाल्यामध्ये कोणत्या प्रकारचा रोग आहे ते पटकन कळते.
तसेच या यंत्राच्या साह्याने संबंधित रोगावर उपाय सुद्धा सांगितला जातो. हे मशीन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सिद्ध होईल.
सामान्यतः बऱ्याच पिकांमध्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये कोणते रोग आहेत याबद्दल शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.शेतकऱ्यांच्या या समस्येला लक्षात घेऊन हिमाचल प्रदेश सरकार ने केलेल्या कामाची शेतकऱ्याने द्वारे प्रशंसा केली जात आहे.
हिमाचल प्रदेश मध्ये या हे यंत्र फार महत्वाचे मानले जात आहे कारण हिमाचलमध्ये जास्तीत जास्त शेतकरी फळांचे उत्पादन घेतात.
भाजीपाला पिकांमध्ये वेगळ्या प्रकारचे रोग असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाला फार उपयुक्त मानले जात आहे.
Published on: 10 September 2021, 10:22 IST