News

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.. यात सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Updated on 01 September, 2023 6:59 PM IST

भाजपविरोधात विरोधक एकवटले, बंगळूरमध्ये आज महत्त्वाची बैठक

भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र एकवटले आहेत. आगामी 2024 च्या लोकसभेत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. सध्याच्या घडीला भाजपाला सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्यापासून रोखणं हाच विरोधी पक्षांचा उद्देश आहे. त्यासाठी आज बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 26 विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. 

पावसाळी अधिवेशनात किरीट सोमय्यांचा मुद्दा गाजणार?

आज राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विरोधकांनी आग्रह धरल्यानं गोंधळ झाला. त्यामुळे विधीमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा विधीमंडळाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोकण, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात

मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भात हलक्या सरी पडल्या असून अजूनही जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे. तसंच राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झालंय. तर घाटमाथ्यावरही पावसाचा प्रभाव कमी झाला होता. मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढू लागलाय.

 

'महाबीज'कडून २५ हजार क्विंटल बियाण्यांतील १५ हजार बियाणे रिजेक्ट

लातूर जिल्हा सोयाबीनचे हब आहे. त्यामुळे महाबीज अर्थातच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे सुद्धा लातूर जिल्ह्यावर अधिक लक्ष असते. या वर्षी जिल्ह्यातील ८८७ शेतकऱ्यांनी २५ हजार ४५ क्विंटल सोयाबीन महाबीजला बियाणासाठी दिले होते. तर सर्व तपासण्या झाल्यानंतर यातील १५ हजार क्विंटल बियाणे रिजेक्ट करण्यात आले आहे.

English Summary: Know 5 important news of the state in one click
Published on: 18 July 2023, 12:06 IST