News

काही दिवसांपूर्वी टोमॉटोवर नवीन आजार आल्याची बातमी माध्यमात आली होती. या आजाराला शेतकऱ्यांनी तिरंगा व्हायरस हे नाव दिले होते. दरम्यान याविषयीची एक सुखद वार्ता हाती आली आहे. या आजाराचा मानवी आरोग्यावर काही परिणाम होत नसल्याचा उलगडा बंगरुळुतील आयआयएचआर संस्थेने केला आहे.

Updated on 25 May, 2020 5:45 PM IST


काही दिवसांपूर्वी टोमॉटोवर नवीन आजार आल्याची बातमी माध्यमात आली होती. या आजाराला शेतकऱ्यांनी तिरंगा व्हायरस हे नाव दिले होते. दरम्यान याविषयीची एक सुखद वार्ता हाती आली आहे. या आजाराचा मानवी आरोग्यावर काही परिणाम होत नसल्याचा उलगडा बंगरुळुतील आयआयएचआर संस्थेने केला आहे. दरम्यान टोमॉटो उत्पादकांनी आयआयएचआर या संस्थेला काही नमुने पाठवले होते, त्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्यानुसार टोमॉटोवर कुकूंबर मोझॅक व्हायरस (सी.एम.व्ही) टोबॅको व्हेन डिस्टर्शन व्हायरस (टी.बी.व्ही.डी.व्ही), ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस व टोमॉटो मोइॅक व्हायरस हे चार मुख्य विषाणूंचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

फळ परिपक्क होण्याच्या काळात तापमान वाढल्याने, खतांचा व पोषकांचा अती वापर झाल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याचे सूचित करण्याचत आले आहे.  वरील विषाणूंचा संसर्ग टोमॅटो पिकात या पुर्वीही आढळलेला आहे. मात्र एकाच वेळी हा संसर्ग साथी सारखा चार जिल्ह्यात पसला आहे. यामुळे या मागील कारण शोधणे आवश्यक असल्याने किसान सभा आक्रमक झाली आहे. टोमॉटो प्रश्न शेतकऱ्यांना अचूक व समाधानकारक निदान उपलब्ध करावे व पीक नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवदेन पाठविण्यात आले आहे.  या रोग निदानाबाबत प्राप्त झालेल्या रिपोर्टबाबत निवेदनात, शंका उपस्थित करण्यात आली आहे.

टोमॉटो, भाज्या व फळभाज्या यासारख्या सर्व नाशवंत पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोगराई व दराबाबतचे चढ-उतार यापासून संरक्षण मिळावे यासाठी विमा योजना सुरू करावी अशी मागणीही निवदेनात केली आहे. दरम्यान या विषाणूच्या निदानात सांगण्यात आलेले कारणात तफावत आढळते. यामुळे शेतकरी याशी सहमत नाहीत. वाढलेल्या तापमानामुले विषाणू संसर्गाचे साथीत रुपांतर झाले असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टोमॉटो उत्पादक पट्ट्यातील तापमान की राहिलेले आहे.

शिवाय एकाच तालुक्यात विविध भौगोलिक पट्ट्यात तापमानात मोठी भिन्नता आहे. विषाणू संसर्गाचे वाहक असलेल्या पांढरी माशी, मावा, कीड यासारख्या संसर्ग माध्यमांचा मोठा फैलाव कोठेही आढळा नाही. असे असताना हा संसर्ग जिल्ह्याच्या सीमा पार करून चार जिल्ह्यात पोहोचला आहे. खंताचा अतिरेक केल्यामुळे हा विषाणू पसरल्याचे अहवालात म्हटले आहे. परंतु शेतकऱ्यांना याची कल्पना असल्याने अतिरेक होणं अशक्य असल्याचं किसान सभेने म्हटले आहे.

English Summary: kisan sabha demand tomatoes defective seeds Inquiry
Published on: 25 May 2020, 05:44 IST