News

शेतकऱ्यांचा शेतमाल देशाच्या विविध बाजारपेठांमध्ये पोहोचून त्यांना योग्य भाव द्यावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने किसान रेल्वेची देवळाली स्थानकातून सुरुवात केली. परंतु आशिया खंडातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव सारखे ठिकाणी या रेल्वेला थांबा नाही.

Updated on 10 September, 2020 2:26 PM IST


शेतकऱ्यांचा शेतमाल देशाच्या विविध बाजारपेठांमध्ये पोहोचून त्यांना योग्य भाव द्यावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने किसान रेल्वेची देवळाली स्थानकातून सुरुवात केली.  परंतु आशिया खंडातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव सारखे ठिकाणी या रेल्वेला थांबा नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लासलगाव येथे किसान रेल्वेला थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली.

याबाबत भुजबळ यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, केंद्र शासनाच्यावतीने देवळाली ते दानापूरपर्यंत देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केले. या रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला पण नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष यासारखी फळे उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये जलद वाहतूक करण्यात येऊन चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने हा प्रसार रेल्वे उपक्रम कौतुकास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा झाला. सुरु झाल्यानंतर रेल्वे आठवड्यातून फक्त एकदाच चालू होती.

परंतु नंतर होणाऱ्या सततच्या मागणीमुळे किसन रेल्वे आता आठवड्यातून तीन दिवस राहते.लासलगाव येथे नाशिक जिल्हा व लगतच्या तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल विपणन आणि साठवणीसाठी आणतात. त्यामुळे लासलगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने रेल्वे स्थानकात किसान रेल्वे थांबा देण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणून भुजबळ यांनी पत्राद्वारे मागणी केली की किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्यात यावा.

English Summary: Kisan Railway should be stopped in Lasalgaon - Demand of Guardian Minister Chhagan Bhujbal
Published on: 10 September 2020, 02:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)