किसान क्रेडिट कार्डधारकांनी बँकेकडून कृषी कर्ज घेतले असले तर त्यांच्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड अर्थात केसीसी धारकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देत असते. याशिवाय या कार्डच्या माध्यमातून शेतकरी शेतीसाठी लागणारी साहित्य , खते , अवजारेंची खरेदी करत असतो. कोरोनाचे संकट देशात आल्यानंतर शेतकऱ्यांना या संकटातून सुटका व्हावी.यासाठी किसान क्रेडिट कार्ड धारकांना कर्ज परतफेडीची मुदत वाढवली होती. आधी केसीसी कर्जधारकांना कर्ज परत फेडीची मुदत ही ३१ मार्च होती, पण त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. यामुळे उद्या कर्ज परतफेडीचा शेवटचा दिवस आहे. जर उद्या आपण कर्ज फेड करु शकला नाहीत तर आपल्याला दंड भरावा लागेल.
जर वेळेत कर्जाची परत फेड केली नाही तर शेतकऱ्यांना ४ टक्क्यांच्या व्याजाऐवजी ७ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. जर शेतकऱ्यांनी यावेळी रक्कम भरली नाही तर अतिरिक्त ३ टक्के अधिक व्याज द्यावे लागेल. दरम्यान किसान क्रेडिट कार्डधारकांना ३१ मार्चपर्यंत कर्ज परत करावे लागते. त्यानंतर शेतकरी पुढच्या वर्षासाठी पुन्हा पैसे घेऊ शकतो. काही शेतकरी चालू असलेले कर्ज वेळेवर परत करुन व्याजदरात सवलत मिळवत असतात आणि नंतर पुन्हा नवीन वर्षासाठी नव्याने कर्ज काढत असतात. अशा कल्पननेमुळे बँकेत शेतकऱ्यांचा व्यवहार व्यवस्थित राहत असतो. दरम्यान, केसीसी धारकांना सरकार १.६० लाख रुपयांचे कर्ज विना तारण पुरवत असते. आधी फक्त १ लाख रुपयांचे कर्ज दिले जात होते. जर आपण क्रेडिट कार्डवरुन कर्ज घेतले असेल तर उद्या आपल्याला कर्जाची परत फेड करावी लागेल.
किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाचे व्याज किती असते -
केसीसी मार्फत तीन लाख रुपयांपर्यतचे कर्जासाठी ९ टक्के व्याज असते. परंतु सरकार यात २ टक्के अनुदान देते, यामुळे कर्जावर ७ टक्के व्याज द्यावे लागते. जर आपण वेळेवर कर्जाची परतफेड केली तर ३ टक्के अतिरिक्त सुट मिळत असते. याप्रकारे फक्त ४ टक्केच व्याज कर्जावर आकारले जाते. जर वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही तर आपल्याला ७ टक्के व्याज द्यावे लागेल.
काही सेंकदातच मिळते किसान क्रेडिट कार्ड
शेतकरी किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्यांच्याकडे https://pmkisan.gov.in/ लिंक आहे ते किसान क्रेडिटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जो या योजनेचा लाभार्थी नाही तोही या संकेतस्थळावर जाऊन कार्ड घेऊ शकतो. या क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक होमपेज दिसेल. त्यावर केसीसी डाऊनलोड असा एक पर्याय असेल तो निवडावा लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल. या लिंक व्यतिरिक्त तुम्ही या संकेतस्थळावरुन https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf. अर्ज मिळवू शकता.
Published on: 30 August 2020, 02:54 IST