News

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासन यादवांकडून वेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. बर्याकच प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावण्याचे काम सरकारकडून होताना दिसत आहे.

Updated on 10 January, 2022 10:56 AM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासन यादवांकडून वेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. बर्‍याच प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावण्याचे काम सरकारकडून होताना दिसत आहे.

त्यातलाच एक भाग म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरत आहे. किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येत नाही. शेतकरी आपल्या शेती संबंधित आर्थिक गरजा या कार्डच्या माध्यमातून भागवू शकतात. आता पशुपालकांनाआणिमासे उत्पादक शेतकऱ्यांनाही या कार्डचा लाभ देण्यात यावा यासाठी प्रक्रिया सुरू आहे. केसीसी चा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वात घेतलेला असून त्याखालोखाल राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले आहे. एकदा महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रात 39 लाख 49 हजार 144 शेतकऱ्यांनी केसीसी चा लाभ घेतलेला आहे. या कार्ड च्या माध्यमातून  पशुपालन आणि मत्स्य व्यवसायासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होईल त्यासोबतच केसीसी कार्डधारकांना तीन लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. बँकेत तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड तयार करावे लागणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही.

 किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक पात्रता

  • सामूहिक शेती करणारे तसेच वैयक्तिक शेतकरी
  • बचत गटाच्या माध्यमातून शेती करणारे शेतकरी
  • तोड बटाईने शेती करणारे शेतकरी यासाठी पात्र असतात.

केसीसी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे…..

  • किसान क्रेडिट कार्डचा बँकेतून घेतलेला अर्ज पूर्ण व नीट भरावा लागेल.
  • ओळख प्रमाणपत्रासाठी  वोटर आयडी, पॅन कार्ड, पासपोर्ट तसेच आधार कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक
  • इतर कोणत्याही बँकेत कर्जदार नाहीत असे प्रतिज्ञापत्र
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

वेळेवर परतफेड केल्यास व्याज मिळते भरघोस सूट….

 किसान क्रेडिट कार्ड वर एकंदरीत नऊ टक्के व्याजदर असून त्यामध्ये सरकार दोन टक्के सवलत देते.जर घेतलेले कर्ज वेळेवर परत केले तर त्यामध्ये आणखी तीन टक्के सूट मिळते.म्हणजेच सरकारकडून असलेली दोन टक्के सवलत अधिक वेळेवर भरणा केल्यास मिळणारी तीन टक्के सूट मिळूनपाच टक्के एकूण सूट मिळते. म्हणजे शेतकऱ्यांना अवघे  चार टक्के व्याज अदा करावे लागते.

English Summary: kisan credit card scheme is benificial for farmer mahatashtra take more benifit to this scheme
Published on: 10 January 2022, 10:56 IST