News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिलीच खिल्लार जनावरांची मान पट्ट्यातील सिद्धनाथांची पौषी यात्रा खरसुंडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी घेऊन भरवण्यात आली होती. या यात्रेमध्ये अवघ्या चार दिवसात 4200 जनावरांची खरेदी-विक्री होऊन तब्बल 10 कोटींच्या आसपास उलाढाल झाली.

Updated on 24 February, 2021 4:01 PM IST

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिलीच खिल्लार जनावरांची मान पट्ट्यातील सिद्धनाथांची पौषी यात्रा खरसुंडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी घेऊन भरवण्यात आली होती. या यात्रेमध्ये अवघ्या चार दिवसात 4200 जनावरांची खरेदी-विक्री होऊन तब्बल 10 कोटींच्या आसपास उलाढाल झाली.

या परिसराचा विचार केला तर गाई, खोंड व पैदा सी करता पाण्यात येणारे वळू बैल या परिसरात आहेत. खिल्लार ही जात सगळ्या कामांमध्ये इतर जातींपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असल्याने महाराष्ट्रातील अहमदनगर, नासिक, मराठवाडा, विदर्भ तो महाराष्ट्रातील इतर भागातून व्यापारी या यात्रेत खासकरून येत असतात. या यात्रेत या वर्षी 30 हजारांपेक्षा जास्त जनावरांचीआवक झाली होती. 27 जानेवारी पासून  ही यात्रा भरून दोन-तीन दिवस या यात्रेत जनावरांची आवक वाढत होती. यात्रे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षात पहिलीच यात्रा भरल्यामुळे इतर राज्यातून जसे की कर्नाटक,  आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील व्यापारी राज्यातील व्यापारी खरेदीसाठी दाखल झाले होते.

त्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले. जयद्रथ कमीत कमी दहा हजारतर जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत खोंड व बैलांची खरेदी झाली.यात्रा गावापासून एक किलोमीटरवर भरल्यामुळे व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना खरेदी-विक्री करणे सोयीचे झाले. तसेच संबंधित ग्रामपंचायत व बाजार समितीने पाणी, दिवाबत्ती आणि जनावरांकरिता वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्या.

English Summary: Kharsundi Poush Yatra has a turnover of Rs 10 crore in four days
Published on: 12 February 2021, 01:08 IST