यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या प्रकारच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याला सोयाबीन पीक सुद्धा अपवाद नाही. सोयाबीनचे देखील मोठ्या प्रमाणात खरीप हंगामामध्ये नुकसान झाले होते.
हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकविध उपाययोजना केल्या, मात्र नैसर्गिक संकटांमुळे उन्हाळी हंगामातील पिकांना देखील धोका निर्माण झाला होता. या वर्षी प्रथमच उन्हाळी सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु उन्हाळी हंगामात सुद्धा सातत्याने सुरुवातीपासूनच वातावरणातील बदल तसेच ढगाळ हवामानाचा फटका उन्हाळी हंगामात सोयाबीन ला बसणार असे चित्र निर्माण झाले होते. परंतु शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन अखेर सोयाबीनला फलधारणा अवस्थेपर्यंत आणले आहे.
त्यामुळे खरीप हंगामात झालेले सोयाबीनचे नुकसान उन्हाळी हंगामात भरून निघेल असा एक आशावाद शेतकऱ्यांमध्ये आहे. यावर्षी प्रथमच बेमोसमी सोयाबीनचा प्रयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन असून आता धोका टळल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसे पाहायला गेले तर सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले होते. तसेच यावर्षी सोयाबीनला बाजार भाव देखील चांगल्या प्रमाणात आहे.
त्यामुळे खरीप हंगामात झालेले सोयाबीनचे नुकसान उन्हाळी हंगामात भरून काढण्याचा पक्का निर्धार शेतकर्यांनी केला होता व या निर्धाराला कृषी विभागाचे योग्य मार्गदर्शन आणि पीक पद्धतीमधील बदल व त्याचे महत्त्व पटवून सांगितल्यामुळे यंदा प्रथमच बेमोसमी सोयाबीनचा पेरा सहा हजार हेक्टर वर झाला आहे. आता सोयाबीनचे पीक आणि शेंगा धरण्यास सुरुवात केली असून पीक फळधारणा होऊन शेतात बहरत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनचे खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामात भरून निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे
Published on: 30 January 2022, 10:27 IST