यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत, महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी मुळे कांदा पिकाला चांगला मोठा फटका बसला होता, कांदा पीक हे अवकाळी मुळे पूर्ण क्षतीग्रस्त झाले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट नमूद करण्यात आली, शिवाय जो कांदा बाजारात दाखल होतोय त्या कांद्याचा दर्जा देखील अवकाळी मुळे पूर्ण खालावला गेला आहे. आणि म्हणून मार्केटमध्ये येत असलेला कांदा हा निकृष्ट दर्जाचा असल्याने त्याला अपेक्षित एवढा बाजार भाव मिळत नाहीये. या एकंदरीत परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान बघायला मिळत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत खरीप हंगामातील लाल कांदा हा पूर्णतः चांगला दर्जाचा होता मात्र ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली याचा परिणाम कांद्याच्या पिकावर बघायला मिळाला, काढणीला आलेला कांदा हा पावसामुळे मातीमोल झालेला बघायला मिळाला. आता लाल कांद्याची काढणी सुरू आहे, मात्र बाजारात येत असलेला कांदा हा पावसामुळे पूर्णतः भिजलेला आहे. त्यामुळे त्याला बाजारात कमी बाजार भाव प्राप्त होत आहे. अनेक जाणकार लोक असे सांगत आहेत की सध्या बाजारात येत असलेला कांद्यापैकी 75 टक्के कांदा हा अवकाळी पावसाच्या सपाट्यात सापडला आहे आणि हा संपूर्ण कांदा पावसाने भिजलेला आहे
पावसाने भिजल्यामुळे बाजारात येत असलेला कांद्याचा दर्जा कमालीचा ढासळलेला आहे. कांद्याचा दर्जा हा नेहमी सारखा नसल्याने परराज्यातून लाल कांद्याला मागणी कमी आहे, तसेच कांदा व्यापारी या लाल कांद्याला परराज्यात पाठवत नाहीत, कारण की हा कांदा भिजलेला असल्याने तो प्रवासात खराब होऊ शकतो. लाल कांदा जास्त काळ साठवता येत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या मिळेल त्या भावात कांद्याची विक्री करताना दिसत आहेत. कांदा उत्पादक व्यापाऱ्यांच्या मते, जानेवारी महिन्यापासून चांगल्या लाल कांद्याची आवक येण्यास सुरुवात होईल, आणि तेव्हा लाल कांद्याला चांगला भाव देखील मिळेल. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कांदा बाजारात कांद्याची प्रचंड आवक वाढली आहे.
यामुळे कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण बघायला मिळाली. लासलगाव बाजारपेठेत कांद्याचे दर हे आठवड्याभरातच 900 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासमवेतच राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. शिवाय अजून एक ते दीड महिना कांद्याचा दराबाबत अशीच परिस्थिती बघायला मिळेल असे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक आपले मत व्यक्त करत आहेत.
Published on: 27 December 2021, 01:54 IST