News

Kharif Season: देशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातही काही भागात सुरुवातील पाऊस पडल्यामुळे खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत.

Updated on 05 September, 2022 11:55 AM IST

Kharif Season: देशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. राज्यातही काही भागात सुरुवातील पाऊस पडल्यामुळे खरीप पिकांची (Kharif crop) पेरणी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी (farmers) आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. यंदाच्या हंगामात मान्सूनने (Monsoon) सुरुवातीला जोरदार हजेरी लावली. मात्र खरीप पिके जोमात असतानाच पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकायला लागली आहेत.

मान्सूनचा पाऊस उघडल्यानंतर खरीप पिकांवर रोगाचे सावट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावर फवारणी केली तसेच खुरपणी आणि इतर कामेही करून घेतली मात्र पाऊस पडत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आणखी थोडे दिवस पाऊस पडला नाही तर पिके जाळून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

PM Kisan: प्रतीक्षा संपली! या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 12 व्या हफ्त्याचे 2000 हजार रुपये

वाशीम (Vashim) जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने उघडीप घेतल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघणे अवघड झाले आहे. खरीप पिकांवरील संकटाची मालिका सुरूच असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

"अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार"

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आता तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पाणीसाठा आहे पण विजेचा लपंडाव आणि सोयाबीनचे क्षेत्र पाहता सर्वच पिकांना पाणी देणे मुश्किल होणार आहे. मात्र, पावसाबाबत शेतकरी आशादायी असून काही दिवसांमध्ये पावसाचे पुनरागमन होईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

महत्वाच्या बातम्या:
Gold Price Update: सोने 5600 रुपयांनी स्वस्त! 10 ग्रॅम सोने 30 हजारांपेक्षा कमी भावाने खरेदी करा...
निवृत्तीचे वय वाढणार, जाणून घ्या EPFO ​​ने मर्यादा वाढवण्याचे समर्थन का केले

English Summary: Kharif crops in crisis
Published on: 05 September 2022, 11:55 IST