News

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी विधानसभेत 75,800 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी 9,669 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मोहल्ला क्लिनिक आणि पॉलीक्लिनिकसाठी 475 कोटी रुपये, दिल्ली सरकारी रुग्णालये अपग्रेड करण्यासाठी 1,900 कोटी रुपये.

Updated on 27 March, 2022 4:48 PM IST

गेल्या काही दिवसांपासून देशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचीच चर्चा आहे. त्यांनी पंजाबमध्ये देखील सत्ता मिळवत इतिहास घडवला आहे. तसेच दिल्लीत देखील अनेक कामे केली आहेत. असे असताना आता दिल्लीचे बजेट नुकतेच सादर झाले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी विधानसभेत 75,800 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक गोष्टींला हात घालण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा आहे.

कोविड -19 च्या प्रभावातून दिल्लीची अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे. 2022-23 साठी अर्थसंकल्पीय तरतूद 75,800 कोटी रुपये आहे," सिसोदिया यांनी त्यांच्या बजेट भाषणात सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांच्या सरकारचा 'रोजगार बजेट' तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल. अर्थसंकल्पात दिल्लीतील प्रत्येक वर्गाची काळजी घेण्यात आली आहे, असे केजरीवाल म्हणाले.

दिल्लीसाठी 'रोजगार अर्थसंकल्प' सादर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांचे खूप खूप अभिनंदन. या अर्थसंकल्पामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. या अर्थसंकल्पात दिल्लीतील प्रत्येक घटकाची काळजी घेण्यात आली आहे, केजरीवाल म्हणाले. दिल्लीचे दरडोई उत्पन्न 2021-22 या आर्थिक वर्षात सध्याच्या किमतींनुसार 4,01,982 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 2020-21 मध्ये ते 3,44,136 रुपये होते. हे दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात 16.81 टक्क्यांनी वाढ दर्शवते.

दिल्लीत गेल्या 7 वर्षांत 1.78 लाखांहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी 51,307 जणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 'रोजगार बजेट'च्या माध्यमातून पुढील पाच वर्षात आणखी 20 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले. तसेच या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी 9,669 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मोहल्ला क्लिनिक आणि पॉलीक्लिनिकसाठी 475 कोटी रुपये, दिल्ली सरकारी रुग्णालये अपग्रेड करण्यासाठी 1,900 कोटी रुपये, सिसोदिया म्हणाले.
नवीन इलेक्ट्रॉनिक शहर उभारले जाईल, तर व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत नवीन स्टार्ट-अप धोरण आणले जाईल, यासह अनेक घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

महत्वाच्या बातम्या;
भावा फक्त तूच रे!! परदेशातील नोकरीला लाथ मारून करतोय शेती, आज लाखोंची उलाढाल
मोठी बातमी! ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय, कर्जमाफीबाबाबत आता शेतकऱ्यांचे टेन्शनच मिटले..
...म्हणून मला त्या फाइलवर सही करावी लागली!! आणि शेतीत बदल घडवायचा असे मी मनाशी पक्के ठरवले

English Summary: Kejriwal Binbobhat is elected !! Read this budget once.
Published on: 27 March 2022, 04:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)