कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यासह मजूर वर्गालाही या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. हातातील काम गेल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काही शेतकऱ्यांना शेतमाल शेतात सडू द्यावा लागत आहे. वाहतूक सुरळीत नसल्याने शेतकरी बेजार झाले असून त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत. या अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी खूशखबर दिली आहे.
टर्म लोन घेतलेल्या शेतकऱ्यांकडून सरकारने दिलासा दिला आहे. ३१ मे पर्यंत कर्जाचा हप्ता देण्यापासून शेतकऱ्यांना सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर शेतकरी आपले हप्ते भरू शकतील. याशिवाय जर हप्ते भरण्यास उशिरा झाला तर शेतकऱ्यांना कोणतीच विलंब फी आकारली जाणार नसल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे खरीप हंगामावर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने शेतकऱ्यांना शेतीच्या वस्तूंवर सूट दिली आहे. किसान क्रेडिटने शेतीसाठी लागणारे वस्तू, अवजारे, खते घेतल्यास त्यावर सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासह अजून दोन गोष्टी आहेत ज्या केसीसी धारकांसाठी फार फायदेशीर आहेत.
शेतकरी या कार्डच्या साहाय्याने १.६० लाख रुपयांचे कर्ज कोणतीही हमी न देता घेऊ शकणार आहे. तर किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी १० टक्के रक्कम आपल्या घरगुती खर्चासाठी वापरु शकणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सरकार शेतकऱ्यांना कार्ड उपलब्ध करू देत आहे. ज्याच्या मदतीने शेतकरी १. ६० लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकते.
कोणत्या बँकामध्ये मिळते किसान क्रेडिट कार्ड
एनपीसीआय नॅशनल पेमेंट्स कॉपोरेशन ऑफ इंडिया रुपये किसान क्रेडिट कार्ड ऑफर करते. यासह नाबार्ड सोप्या अटींवरती कर्ज देते. एसबीआय, बॅक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय मधूनही किसान क्रेडिट कार्ड मिळते.
अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
आन्ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड
बँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)
बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
कॅनरा बँक – केसीसी
कॉरपोरेशन बँक – केसीसी
देना बँक – किसान गोल्ड क्रेडिट कार्ड
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
पंजाब नॅशनल बँक – पीएनबी कृषि कार्ड
स्टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी
स्टेट बँक ऑफ इंडिया - केसीसी
सिंडिकेट बँक – एसकेसीसी
विजया बँक – विजया किसान कार्ड
आयसीआयसीआय बँक, याशिवाय जवळच्या बँकेशी तुम्ही संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
Published on: 20 May 2020, 06:20 IST