News

पुणे : कायम अशांत म्हणून ओळख असलेल्या काश्मीरच्याबाबत आणिक दिवसांनी काहीतरी चांगले घडले आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध असणाऱ्या केशरला जिऑग्राफिकल टॅग म्हणजेच भौगोलिक संकेत मिळाला असून त्यामुळे आता त्यामध्ये कोणीही भेसळ करू शकणार नाही.

Updated on 28 July, 2020 6:52 PM IST


पुणे : कायम अशांत म्हणून ओळख असलेल्या काश्मीरच्याबाबत आणिक दिवसांनी काहीतरी चांगले घडले आहे.  काश्मीरमधील प्रसिद्ध असणाऱ्या केशरला जिऑग्राफिकल टॅग म्हणजेच भौगोलिक संकेत मिळाला असून त्यामुळे आता त्यामध्ये कोणीही भेसळ करू शकणार नाही.  खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे.  भारतात जम्मू आणि काश्मीर येथे केशराची लागवड करतात. विशेष म्हणजे काश्मीर हे केशरसाठी ओळखले जाते.

केशर साधारणपणे जमिनीपासून १६०० मीटर एवढ्या उंचीवर येते.  काश्मीरमधील वातावरण केशरसाठी अतिशय चांगले आहे.  त्यातच सरकारने केशर मिशनअंतर्गत ४०० कोटी रुपये खर्च केल्यामुळे यावर्षी केशर मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यात हा टॅग मिळाल्यामुळे भेसळीला आळा बसून शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळणार आहे. भौगोलिक संकेत प्रमाणपत्र केंद्र सरकारतर्फे दिले जाते. काश्मीरला हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे केशराच्या निर्यातीला मोठा हातभार लागणार आहे. तसेच या टॅगमुळे हे उत्पादन अधिक खपण्यासाठी मदत होणार आहे.

सुमारे ४०,००० फुलांपासून अर्धा किग्रॅ. केशर मिळते, यामुळे ते महाग असते. केशराचा दर्जा ठरविण्यासाठी ते पाण्यात टाकतात.  तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे, तर पाण्यावर तरंगणारे केशर हलक्या प्रतीचे मानतात. तरगंणारे केशर वाळवून झोडतात आणि त्याचा दर्जा ठरविण्यासाठी ते पुन्हा पाण्यात टाकतात. भारतातील केशराचे शाही केशर, मोग्रा केशर आणि लांचा केशर असे तीन प्रकार आहेत.  शाही केशर उच्च प्रतीचे असते, तर लांचा केशर हे हलक्या प्रतीचे असते.

केशरचे अनेक फायदे आहेत. केशर सुवासिक, उत्तेजक, शक्तिवर्धक, मूत्रल आणि रेचक असते. केशर श्वासननलिकादाह, घशाचे विकार आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी असते, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. स्मरणशक्ती वाढते, पचनसंस्था सुधारते, दम्याचा त्रास कमी होतो, केशर गरोदर महिलांसाठीही केशर फार फायदेशीर असते.  खरचटणे, साध्या जखमा, संधिवात इत्यादींवर केशराचा लेप लावतात. केशराचा प्रमुख उपयोग मिठाई व इतर खाद्यपदार्थांना स्वाद आणि रंग आणण्यास करतात.

English Summary: Kashmir's saffron got geographical identification
Published on: 28 July 2020, 06:52 IST