शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रविकास योजनेचा पैसाच मिळेना

05 July 2020 08:07 PM By: भरत भास्कर जाधव
संग्रहित  छायाचित्र (प्रतिनिधीक)

संग्रहित छायाचित्र (प्रतिनिधीक)

कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रविकास योजनेतून आपल्याला फायदा होईल अशा आशेने शेतकऱ्यांनी आपल्याकडील पैसा शासनाच्या योजनेत गुंतवला परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजून मिळेला नाही. गेल्या एक वर्षापासून शेतकरी या योजनेच्या पैशांची वाट पाहत आहेत.  दरम्यान यासाठी शेतक-यांची शाश्वत शेती विकास योजनेचे पैसे तात्काळ आदा करावे या मागणीसाठी पप्पूशेठ धोदाड याच्या नेतृत्वाखाली कुंभेफळ ग्रामस्थ  सोमवारी ६ जुलैला सकाळी उपोषण करणार आहेत.

   याबाबत कुंभेफळ ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कुंभेफळ गावाची राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्रविकास या योजनेत २०१९ या वर्षासाठी निवड करण्यात आली होती. कोरडवाहू क्षेत्रविकास योजनेंतर्गत नेमलेल्या समितीच्या समक्ष गावातील लाभार्थी  शेतकऱ्यांनी ३० / १२ / २०१ ९ रोजी दुग्धसंकरीत गाईचे खरेदी केले. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६०-८० हजारांची गुंतवणूक केली आहे, व लाभार्थी म्हणून शासनाकडून २०,००० रु . लाभ हा मिळण्यासाठी गेल्या ८ महिन्यापासून लाभार्थी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. वेळोवेळी तोंडी विनंती केली, पाठपुरावाही केला तरीही शासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत.  बहुतांश लाभार्थी शेतकऱ्यांनी गाई खरेदीसाठी वापरलेली रक्कम ही व्याजाने काढलेली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. सदरील समस्याची दखल शासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुंभेफळ गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत अन्यथा नाईलाजास्तव कर्जत तहसिल कार्यालयासमोर उपोषण करावे  लागेल असे म्हटले आहे.

या योजनेतील सर्व लाभार्थी गाई- गुरांसकट सामाजिक अंतर ( Social Distancing ) तसेच मास्क चा वापर करून आमरण उपोषण करणार आहेत. या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पप्पू धोदाड, सरपंच काकासाहेब धांडे, अहमदनगर धोदाड, बाळासाहेब पाटील, शांतीलाल वांळूजकर, युसूफ शेख, बबन उकिरडे, बिभीषण शिंदे, ज्ञानदेव धोदाड, आबासाहेब धोदाड, बाळासाहेब धोदाड आदींच्या सहया आहेत.

government scheme koradwahu shetravikas yojana karjat farmer farmer
English Summary: karjat farmer didn't get money of government scheme koradwahu shetravikas yojana

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.