News

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धरतीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत कृषी च्या संलग्न व पारंपारिक उपक्रम तसेच लघु व मध्यम उद्योग व उत्पादन तसेच व्यापार व विक्री या सेवा क्षेत्रासाठी वैयक्तिक आणि गट कर्ज घेतलेल्यांना कर्जाच्या व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित लाभार्थी कुटूंबाचे आणि गटाचे सदस्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये इतके बंधनकारक आहे. यासाठी लाभार्थ्यांना अर्ज करावा लागणारा असून तसे आवाहन महामंडळाच्या वतीने केले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ च्या धर्तीवर वसंतराव नाईक महामंडळाच्या वतीने बेरोजगारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Updated on 13 July, 2021 7:03 PM IST

 या योजनेसाठी असलेल्या पात्रता व अटी

  • यासाठी लाभार्थ्याचे वय 18 ते 50 या दरम्यान असावे.
  • सर्व मिळून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपये असावे.
  • संबंधित अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.
  • तसेच संबंधित लाभार्थ्याने महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • यादी अर्जदाराने कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • तो कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

गट कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज मर्यादा रुपये 10 ते 50 लाखांपर्यंत असून लाभार्थीचे वय 18 ते 45 दरम्यान असावे असे जिल्हा व्यवस्थापक मधुकर ताजने यांनी स्पष्ट केले.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा

 लाभार्थ्यांनी www.vjnt.in या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत.

 आवश्यक कागदपत्रे

1-अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2- तसेच तो विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.

3- ऑनलाइन अर्ज करताना शाळा सोडल्याचा दाखला

4- जात व उत्पन्नाचा दाखला

5-

लाभार्थ्याच्या स्वतःचे रेशन कार्ड

6-जागेचा पुरावा

  • कोटेशन्स
  • प्रकल्प अहवाल
  • आधार कार्ड, पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे.

 माहिती स्त्रोत- दिव्य मराठी

English Summary: karj vyajacha partava
Published on: 13 July 2021, 07:03 IST