हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत किमतीचा दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी कापूस उत्पादक पणन महासंघाने इको बॅंकेकडून 6 टक्के व्याजदराने घेतलेल्या रुपये सहाशे कोटी कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतघेण्यात आला.
.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.त्यासोबतच 600 कोटी शासन हमी वर कापूस पणन महासंघास राज्य शासनास अदा करावे लागणारे हमीशुल्क देखील माफ करण्यास झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे येथे उभारणार साखर संग्रहालय
देशातील महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान लक्षात घेता पुणे ते जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. पुणे येथे असलेल्या साखर संकुलातील जागेत हे साखर संग्रहालय उभारण्यात येईल.या साखर संग्रहालयास प्रशासकीय मान्यता देणे,संग्रहालयाचे डिझाईन अंतिम करणेतसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे,
संग्रहालयाच्या बांधकाम विषयक कामकाजाचा आढावा घेणे यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक समिती तसेच सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष उभारणी कामकाजावर देखरेखीसाठी कार्यकारी समिती स्थापन करण्यास देखील मान्यता देण्यात आली.
Published on: 23 September 2021, 05:05 IST