News

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असताना आता दिवाळीनंतर कांद्याचे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कांद्याचा किरकोळ भाव 40 रुपये किलोच्या पुढे गेला असून, तो 50 रुपये किलोपर्यंत जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Updated on 17 October, 2022 4:55 PM IST

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असताना आता दिवाळीनंतर कांद्याचे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कांद्याचा किरकोळ भाव 40 रुपये किलोच्या पुढे गेला असून, तो 50 रुपये किलोपर्यंत जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात कांदा १५ ते २५ रुपये किलोने मिळत होता. लवकरच कांद्याचा जुना साठा संपणार असून, सध्याचा पुरवठा शेतकऱ्यांकडून नसून त्या साठ्यातून होत आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. किरकोळ बाजारात कांदा महागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे वखारीत ठेवलेला कांदा शेतकरी बाहेर काढू लागले आहेत. पावसामुळे कांदा खराब होत आहे. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सुमारे 60-80% वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ताजे पीक बाजारात येईपर्यंत किमतीतील तेजी कायम राहील.

या 5 CNG कार दिवाळीत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध, आत्ताच करा बुक

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. परंतु महाराष्ट्राताला कांदा इतर राज्यांच्या तुलनेत चांगला असल्याने या कांद्याला देशभरातून मागणी आहे. दसरा दिवाळी दरम्यान कांद्याची मागणी वाढते. महाराष्ट्रात आयात कांद्याची मागणी वाढणार असा अंदाय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याची किंमती वाढतील असे सांगितले जात आहे.

Diwali: या राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी, भरावा लागणार दंड

दरम्यान, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला. यामुळे राहिलेल्या कांद्याला तरी चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. यामुळे आता दिवाळीनंतर तरी कांद्याला चांगला दर मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या परतीच्या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांकडे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून पैशाची मागणी
ओडिशाचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन; कृषी उन्नती परिषद सुरू, कृषी जागरणतर्फे आयोजन
किसान सन्मान निधीचे २ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा..

English Summary: Kanda will go up to Rs 50 after Diwali, the traders expressed..
Published on: 17 October 2022, 04:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)