सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न हा गंभीर स्वरूप धारण करून उभा आहे. बहुतेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून देखील अजूनही बरास शेतामध्ये उभा आहे.
बऱ्याच उसाला तुरे फुटले असून वजनामध्ये घट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपला ऊस तूटावा यासाठी शेतकऱ्यांची धावपळसुरु आहे. परंतु याच शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा ऊसतोड मजुरांना कडून देखील घेतला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. यामध्ये ऊस तोड कामगारप्रति एकरी 10 ते 12 हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडून करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणूक होत आहे.
नक्की वाचा:SBI ची भन्नाट योजना!! शेतकऱ्यांना 'या'सा
या समस्येतून मार्ग काढण्यासाठीकमला भवानी साखर कारखान्यानेऊसतोडणी मजूर कडूनऊस उत्पादकांचे आर्थिक अडवणूक होऊ नये यासाठी एक एप्रिल 2022 पासून कारखान्याकडे ऊस तोडणी करणाऱ्या ट्रक/ट्रॅक्टर टोळ्या, टायर बैलगाडीवर ट्रॅक्टर गाडी मजूरांना रुपये 50 प्रति टन इतकी वाढीव तोडनि रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रम सिंह शिंदे यांनी दिली
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की उसाचे गाळप आतापर्यंत सहा लाख 36 हजार 879 मेट्रिक टन झालेल्या आहे. आता कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून एप्रिल अखेरपर्यंत हा कारखाना चालणार आहे. कारखाना क्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप होणे महत्त्वाचे असून उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस तोडणी मजुरांची कार्यक्षमता कमी होत आहे.
तसेच ऊस तोडणी करणाऱ्यांकडूनऊस उत्पादक शेतकर्यांची अडवणूक होत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे.
तसेच सद्य परिस्थितीत ऊस जळीत करून तोडण्याचे प्रमाण वाढले असून कारखान्याने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले असून निरनिराळ्या मार्गांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका पार पाडली आहे. त्याचाच भाग म्हणून ऊस तोडणी मजुरांना प्रति टन 50 रुपये इतकी वाढीव तोडणी रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी दिली.(स्रोत-करमाळासमाचार)
Published on: 04 April 2022, 08:27 IST