News

कोणतेही यश सहजासहजी मिळत नसते. यशाचा शिखर पार करायचा असेल तर मेहनतही तितकीच घ्यावी लागते. आपल्या स्वकष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ज्यांनी यशाला गवसणी घातली असे टेफ्ला एंटरटेनमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश सिंग यांनी कृषी जागरण चौपाल अधिवेशनाला आज भेट दिली.

Updated on 10 June, 2022 6:11 PM IST

कोणतेही यश सहजासहजी मिळत नसते. यशाचा शिखर पार करायचा असेल तर मेहनतही तितकीच घ्यावी लागते. आपल्या स्वकष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ज्यांनी यशाला गवसणी घातली असे टेफ्ला एंटरटेनमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश सिंग यांनी कृषी जागरण चौपाल अधिवेशनाला आज भेट दिली. यावेळी कृषी जागरणचे मुख्य संपादक एम सी डॉमिनिक यांच्या हस्ते संचालक कैलाश सिंग यांचा सन्मान करण्यात आला.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व
मी आजपर्यंत अशी कितीतरी यशस्वी लोक पहिली आहेत जे आपल्या आयुष्यात काहीतरी करतात. मात्र कैलाश सिंह हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यापासून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळत असल्याचे गौरवोद्गार कृषी जागरणचे मुख्य संपादक एम सी डॉमिनिक यांनी काढले.


त्यानंतर कैलाश सिंह यांनी कृषी जागरणच्या टीमसोबत त्यांचे अनुभव शेअर केले. यात त्यांनी टेफ्ला कंपनी अतिशय मनोरंजक पद्धतीने सुरू केल्याचे सांगितले. जेएनयूमध्ये शिकत असताना तरुणपणातील अनुभवांपासून ते आतापर्यंतचा सगळा प्रवास त्यांनी कृषी जागरणच्या टीमसोबत व्यक्त केला. त्यांनी तरुणपणातील मजेशीर अनुभव सांगता सांगता कंपनीची सुरुवात कशी केली त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले त्यात आलेले मजेशीर अनुभव सांगितले.

एक मजेशीर अनुभव
त्यांच्या कार्याची पहिली सुरुवात ही एका मजेशीर गोष्टीने झाली. एक माडिया क्षेत्रातला व्यक्ती काही कामानिमित्त JNU मध्ये आला होता. तिथे त्या व्यक्तीने कैलाश यांच्या हातचे कबाब चाखले होते. त्यानंतर त्या व्यक्तीने वर्तमानपत्रात त्यांचीच स्टोरी कव्हर केली. "कैलाश सिंग, कबाब किंग" असे शीर्षक देण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर त्यांच्यात बराच बदल झाला. त्यांनी विद्यापीठात टिफिन सेवा सुरू केली.


टिफिन सेवेला सुरुवात
'टेम्पटिंग टिफिन सर्व्हिस' या नावाने त्यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांपासून मास्टर्सपर्यंत कबाब देणे सुरु केले. कैलाश सिंह म्हणाले होते की जेएनयू सारख्या विद्यापीठात शिकणाऱ्या व्यक्तीला काहीतरी नवीन काम करण्याची वेगळीच आवड असते.

बातमी कामाची: राज्य सरकारने घेतला कृषीबाबत मोठा निर्णय; आता कृषी मालाला मिळेल योग्य भाव

टेफ्ला कंपनीची गोष्ट
ते पुढे सांगतात की, त्यांनी टेम्प्लेटिंग टिफिन सर्व्हिसमधूनच टेफ्ला हा शब्द काढला होता आणि नंतर काही वेळाने ते एका कॉन्फरन्समध्ये पोहोचले आणि त्यांनी पाहिले की तेथे प्रचंड गर्दी जमली आहे त्यानंतर त्यांनी टेफ्लाचे एंटरटेनमेंट आणि इव्हेंट कंपनीमध्ये यशस्वीरित्या रूपांतर केले. आणि तेव्हापासून त्यांचा नवा प्रवास सुरू झाला.


कृषी जागरण आणि टेफ्ला
याशिवाय कृषी जागरण आणि टेफ्ला कृषी क्षेत्रात नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी सज्ज आहेत आणि भविष्यात क्रांती घडवून आणण्यासाठी कृषी जागरणच्या सर्व सदस्यांनी टेफ्लाशी हातमिळवणी केली आहे.

टेफ्ला एंटरटेनमेंट
थिंक फाउंडेशन हा टेफ्लाचा एक सामाजिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश CSR मॉडेल्सचा विकास करणे आणि सदस्यांना त्यांची CSR रणनीती आणि कार्यक्रम तयार करण्यात किंवा अंमलात आणण्यात मदत करणे, संस्थेच्या CSR बांधिलकी आणि कामगिरीचे मूल्यमापन आणि लेखापरीक्षण करणे आणि माहिती आणि मोहीम म्हणून कार्य करणे.

या कार्यक्रमाचा समारोप करताना, कृषी जागरणचे सीओओ डॉ. पंत यांनी जेएनयूच्या त्यांच्या कथा सांगून कैलाश सिंह जी यांचे आभार मानले. या कार्यक्रमात कृषी जागरणच्या संचालिका श्रीमती शायनी डॉमिनिक, पीएस सैनी (वरिष्ठ उपाध्यक्ष), मृदुल उप्रेती (डीजीएम) आणि इतर सदस्य सहभागी होते.

"ग्लोबोइल इंडिया आग्रा एडिशन"
कैलाश सिंह यांनी कृषी जागरणच्या सर्व सदस्यांना "ग्लोबोइल इंडिया आग्रा एडिशन" मध्ये येण्याचे निमंत्रण दिले आणि कृषी जागरण आपल्या प्रभावी कार्यासोबत टेफ्ला कंपनीला कशाप्रकारे मदत करू शकतील हे सांगितले.

महत्वाच्या बातम्या:
सोयाबीनची तेजी कायम; इतिहासात पहिल्यांदाच मिळाला 'इतका' भाव
शेतकऱ्यांनी केली एकी आणि त्यांचे दिवसच बदलेले; कांद्याच्या भावात अशी काही वाढ झाली की...

English Summary: 'Kailash Singh is a personality who inspires us all'
Published on: 10 June 2022, 04:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)