शेती करताना शेतकऱ्यांचे कितीही पूर्वनियोजन असले तरी शेतात या ना त्या कारणाने नुकसान होतेच. कारण आपत्कालीन संकटे कोणत्या स्वरूपात शेतकऱ्यांवर ओढावेल हे सांगता येणं शक्य नाही. अशीच एक घटना घडली आहे. पाथरी तालुक्यातील गुंज येथे. पाथरी तालुक्यातील गुंज येथील विष्णू मंदिर गोशाळेमध्ये कडब्याच्या गंजीला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे.
कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत आर्थिक नुकसान बरेच झाले आहे. जवळपास १ लाख ५० हजार कडबा पेंडी व उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.विष्णू मंदिर गोशाळा यांनी त्यांच्या कडब्याची वळई करुन ठेवली होती. मात्र अचानक या कडब्याने पेट घेतला. शिवाय वारा असल्याने आग आटोक्यात येणं शक्य नव्हतं. त्यामुळे आग वाढतच गेली.
आग लागल्याची माहिती समजताच गावकऱ्यांसह इतर नागरिक आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले. आग विझविण्याचा बराच प्रयत्न केला गेला. मात्र, आगीचा भडका अधिकच वाढला व परिसरात लागलेली आग विझविणे शक्य झाले नाही. पाहता पाहता या आगीत सुमारे १ लाख ५० हजार कडबा पेंडी जळून खाक झाल्या.आगीची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषद पाथरी यांच्या अग्निशामक गाडीने घटनास्थळी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याचे मुख्य कारण अजूनदेखील समोर आले नाही. मात्र आगीत विष्णू मंदिर गोशाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील होत आहे.
सध्या राज्यात उष्णतेची लाट आली आहे. परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट असून मागील काही दिवसांपासून परभणीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसाचे तापमान वाढत चालल्याने आगीसारख्या भीषण घटना घडत आहेत. ज्वारीची काढणी झाली असून अनेक ठिकाणी कडब्याच्या वळई करुन ठेवल्या आहेत. तापमानामध्ये तसेच शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागण्याचे प्रकार घडत असून विष्णू मंदिर गोशाळाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
कृषी पंपांना दिवसा वीज आणि शेतमालाला हमीभाव; काय आहे स्वाभिमानीचा डाव
Mahogany farming: शेतकरी बंधूनो मोहगणीची करा शेती आणि मिळवा लाखोंचा नफा
Published on: 02 May 2022, 06:09 IST