घरी बसून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर केचप आणि टोमॅटो सॉस मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्यवसाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. प्रत्येक घरात या पदार्थाची मागणी असल्याने याच्या विक्रीला कोणताच त्रास नसेल. विशेषत: लहान मुलांना हे केचप खूप आवडते. तर कोरोना संकटात हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आपणासाठी असू शकतो.
व्यवसायासाठी मिळू शकतो ऑनलाइन परवाना :
आज-काल टोमॅटो सॉसचा हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि फुड स्टॉल्सपर्यंत मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यासाठी जास्त भांडवलाची गरज नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतील ते जाणून घेऊया. याशिवाय केवळ 2 लाख रुपये गुंतवून तुम्ही दरमहा 50 हजार रुपये कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे परवाना देखील असणे आवश्यक आहे. ते आपणास fssai द्वारे दिले जाते. आपण ऑनलाइन परवाना घेऊ शकता, जो 10-15 दिवसात उपलब्ध असेल.
या व्यवसायासाठी सर्टिफिकेशन कोर्स
Sauce (सॉस) तयार करण्यासाठी केवळ पाच लोकांची आवश्यकता असते. परंतु उत्पादनाच्या विपणनासाठी आपल्याला 4-5 लोकदेखील ठेवावे लागतील. प्रथम सॉस तयार करण्याचं प्रशिक्षण 6 महिने घेतलं पाहिजे. आपण कोणत्याही संस्थांकडून फुड प्रोसेसिंगचा कोर्सदेखील करू शकता.हा व्यवसाय सुरू करण्यात सरकारदेखील आपली मदत करेल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला 50 हजार ते 10 लाखापर्यंत कमी दरात कर्ज मिळू शकते.
हेही वाचा : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार; सरकारने या योजनेची मुदत वाढवल्यानं मिटणार सिंचनाचा प्रश्न
यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता लागेल :
-
सॉस तयार करण्यासाठी किमान 2 लाख रुपयांची भांडवल असावी.
-
संसाधन म्हणून ग्राइंडर मिक्सी, बॉयलर आणि कमर्शियल स्टोव्हची आवश्यकता असेल.
-
9 ते 10 लोकांच्या मदतीने सॉस बनवण्याचे हे काम करता येते.तसेच आपण हा व्यवसाय 100 यार्ड मध्ये सुरू करू शकता.
Published on: 15 April 2022, 03:46 IST