सध्या अवकाळी पावसामुळं गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, आंबा, केळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काढणीला आलेली पिकं यामुळं वाया गेली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं अद्याप पंचनामे सुरु नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
मराठवाड्यात या अवकाळी पावसामुळं एकूण 62,480 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत फक्त 1 हजार 384 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शून्य टक्के पंचनामे झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह धारशिव आणि बीड जिल्ह्यातील पंचनामे शून्य टक्के झाले आहेत.
शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. मार्चपासून आत्तापर्यंत झालेल्या नुकसानीचे फक्त दोन टक्के पंचनामे झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे रखडले असल्याचे समोर आलं आहे. मात्र, यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप पाहायला मिळत आहे.
अवकाळीने पिके केली जमीनदोस्त, शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट
आधीच कापसाला भाव नाही, त्यामुळं कापूस घरात पडू आहे, कांद्यानेही शेतकऱ्यांना रडवलंय त्यातच आता अवकाळी पावसानं उभी पिकं आडवी झाली आहेत. अशा या संकटामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे होणार कधी? असा सवाल शेतकरी करत आहेत.
रोपवाटिका व्यवसायात चांगली कमाई, अशा प्रकारे कमी खर्चात अधिक नफा मिळणार
या नुकसानं शेतकरी हवालदिल झाला आहे. अजूनही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसामुळं मराठवाड्यात आत्तापर्यंत सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आर्थिक नुकसानीबरोबर जीवितहानी देखील झाली आहे.
मारुतीचा ब्रेझा सीएनजीमध्ये लॉन्च, किंमत खूपच कमी, वाचा पूर्ण वैशिष्ट्ये
अवकाळीने पिके केली जमीनदोस्त, शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट
गाय आणि म्हशी कमी दूध देतात? मग या याकडे लक्ष द्या होईल फायदा..
Published on: 20 March 2023, 10:31 IST