News

Rabbi Jowar : यंदा रब्बी हंगामातील ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात असल्याने ज्वारीचे उत्पादन चांगले असण्याची शक्यता आहे. तसंच पशूधनास कडबा चारा देखील मुबलक मिळणार आहे. मात्र राज्याच्या काही भागात नोव्हेंबरच्या अवकाळीचा मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

Updated on 08 January, 2024 2:55 PM IST

Parbhani News : यंदा २०२३-२४ च्या रब्बी हंगामात परभणी जिल्हा परिसराच्या शेतशिवारात टाळकी ज्वारी मोठ्या प्रमाणात बहरल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळीचा पावसाचा अनेक पिकांना फटका बसला. हरभरा पिकाचे नुकसान झाले. मात्र ज्वारी पिकाला पाऊस पोषक ठरला आहे.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने नाजूक असलेले हरभरा पीक करपले. परंतु ज्वारी मात्र जोमदारपणे वाढली. शेतशिवाराने ज्वारीच्या माध्यमातून हिरवा शालू पांघरला आहे. सध्या ही ज्वारी निसवून कणसात आली आहे. कणसास फुलोरा लागूण ज्वारी आता दाणे भरण्याच्या स्थिती आहे. ज्वारी पीकाच्या जवळून फेरफटका मारला असता फुलोऱ्यातून सुगंध दरवळतो आहे.

यंदा रब्बी हंगामातील ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात असल्याने ज्वारीचे उत्पादन चांगले असण्याची शक्यता आहे. तसंच पशूधनास कडबा चारा देखील मुबलक मिळणार आहे. मात्र राज्याच्या काही भागात नोव्हेंबरच्या अवकाळीचा मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वादळीवाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पाऊसाने काही ठिकाणी नदी नाल्यांना पुरही आला आहे. पहाटेच्या सुमारास वादळीवा-यास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला होता. या पाऊसाने काही ठिकाणी नदी नाल्यांना पुरही आले. हा अवकाळी पाऊस पडून सहा दिवस उलटून जात असतानाही ज्या भागात पाऊस झाला त्या ठिकाणच्या नदीवरील बंधारे पाण्याने अजूनही ओव्हरफ्लो झाल्याचे पहायला मिळाले होते.

English Summary: Jowar Crop Update Rabi jowar crop is in full swing in Parbhani this year gram chana is affected by unseasonal weather.
Published on: 08 January 2024, 02:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)