शेतीमधून उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी नवीन नवीन प्रयोग करत आहेत जे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्यास जास्त मागणी आहे त्याची शेतकरी लागवड करू शकतात. भारतामध्ये मागील काही वर्षांपासून जोजोबा ची शेती वाढतच चालली आहे. जोजोबा ही विदेशी वनस्पती आहे जे की भारतामध्ये आता लागवड सुरू झाली आहे. राजस्थान मध्ये जोजोबा ची लागवड केली जाते जे की ही एक राजस्थानी वनस्पती आहे. जोजोबा वनस्पती ला जास्त पाण्याची गरज लागत नाही जसे की भारतामध्ये मोहरी, राई, शेंगदाणे, तीळ, सोयाबीन व सूर्यफूल यापासून तेल काढले जाते तसेच परदेशात सुद्धा जोजोबा ही तेलबिया म्हणून वनस्पती वापरली जाते. आहे.अॅरिझोना, मेक्सिको आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये या देशांमध्ये अनेक वर्षांपासून जोजोबा ची लागवड केली जाते. जोजोबा ही एक भाजी आहे तसेच या वनस्पती मधून ४० ते ४५ टक्के तेल काढले जाते.
भारतामध्ये कुठे केली जाते लागवड :-
भारतात राजस्थान राज्यामध्ये जोजोबा ची लागवड केली जाते जे की शेतकरी जोजोबा ची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न काढत आहेत. परदेशात सुद्धा जोजोबा भाजीची मागणी वाढली आहे. अगदी कमी कालावधीत च जास्त मागणी वाढली असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. जोजोबा तेलाची किमंत जास्त असल्यामुळे कॉस्मेटिक साहित्य तयार करणाऱ्या कंपन्या त्याचा वापर करत आहेत. जोजोबा चे तेल उत्तम प्रकारचे तसेच जास्त सुगंधित असल्यामुळे जास्त मागणी आहे. जोजोबा चे एवढे महत्व असल्यामुळे स्वतः राजस्थान सरकारने असोसिएशन ऑफ राजस्थान जेजोबा वृक्षारोपण संशोधन प्रकल्पाचीच स्थापना केली. जोजोबाच्या बियाणांवर प्रक्रिया करून तेल काढले जाते आणि विकले जाते मात्र प्रथमता शेतात जाऊन त्याच्या बिया गोळा कराव्या लागतात व नंतर त्या सावलीमध्ये ठेऊन वाळविल्या जातात. बिया वाळायला खूप वेळ लागतो.
अशाप्रकारे जोजोबातून उत्पन्नही मिळते :-
जोजोबा ची बियाणे प्रक्रिया प्रकल्पात टाकून आधी दळून घ्यावी जे की त्यावेळी बियानामधून तेल बाहेर पडण्यास सुरू होते. फिल्टर लावून हे तेल गाळले जाते आणि स्टेलनिस स्टील च्या टाकीमध्ये त्याचा साठा केला जातो. जशी गरज लागेल त्यानुसार बॉक्स मध्ये तेल पॅक करून पुढे पाठवले जाते. मागील काही वर्षामध्ये जोजोबा लागवडीत लक्षणीय वाढ झालेली आहे. भारतामधून इतर देशात वाढीव उत्पादनामुळे जोजोबा ची निर्यात केली जाते. जोजोबा वनस्पती ला जास्त पाणी ही लागत नाही. जोजोबा ची लागवड दिवसेंदिवस वाढतच चालली असल्यामुळे प्रोसेसिंग युनिटही चालू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला आता मागणी वाढेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे.
व्यवसायिक दृष्टीने जोजोबा कडे पाहिले जातेय :-
जोजोबा च्या तेलबियानापासून जी कॉस्मेटिक साहित्य आहेत ती बनवली जात आहेत. कारण जोजोबा चे तेल उच्च प्रतीचे आहे त्यामुळे सुगंधित सौंदर्य प्रसादने सुद्धा अगदी सुगंधित बनत आहेत. कॉस्मेटिक कंपन्यांकडून जोजोबाच्या तेलाला मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मागणी वाढलेली आहे. सध्या व्यावसायिक दृष्टिकोणातुन जोजोबा वनस्पती कडे पाहिले जात आहे. परदेशात सुदधा जोजोबा ला मोठी मागणी आहे.
Published on: 22 February 2022, 07:16 IST