News

कृषी क्षेत्रात काम नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक संधी चालून आली आहे. नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याविषयीची जाहिरात करण्यात आली असून योग्य आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांवर अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे, त्यावरून आपण अर्ज करु शकता.

Updated on 26 June, 2020 8:42 PM IST

 

कृषी क्षेत्रात काम नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक संधी चालून आली आहे. नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याविषयीची जाहिरात करण्यात आली असून योग्य आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांवर अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे, त्यावरून आपण अर्ज करु शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १५ जुलै २०२० आहे. यानंतर करण्यात आलेले अर्ज बाद ठरविण्यात येतील.

पदांचा तपशील  -

नोकरीचे ठिकाण (Job location)  - मुंबई

पदांचे नाव (Name of Posts):

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)

रोजगार प्रकार - पूर्णकालिक (Full Time)

पदांची संख्या - १८६ जागा

शैक्षणिक योग्यता  - अर्जदार

केमिकल / मेकेनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल मध्ये बीई किंवा बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण असावा.

वेतन  - या पदासाठी  उमेदवारास मासिक वेतन ४० हजार ते १, ४० हजार रुपये असेल.

वयाची मर्यादा - २५ वर्ष

ऑपरेटर प्रशिक्षणार्थी (Operator Trainee)

रोजगार प्रकार - पूर्णकालिक (Full Time)

रिक्त जागा - १२५

शैक्षणिक योग्यता - उमेदवार बीएससी ( रसायन विज्ञानाची पदवी उत्तीर्ण असावा ) 

वेतन - या पदासाठी मासिक वेतन  - २२ हजार ते ६० हजार रुपये असेल.

वयाची मर्यादा -  २७ वर्ष 

 

अभियंता (Engineer)

रोजगार प्रकार - पूर्णकालिक (Full Time)

पदांची संख्या - १० जागा 

शैक्षणिक योग्यता  - उमेदवार हा बीई UGC किंवा AICTE यांच्या मान्यता प्राप्त संस्थेतून टेक Tech किंवा बीएससी इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण असावा.

वेतन - ४० हजार ते १,४०००० रुपये असेल.

वयाची मर्यादा - ३५ वर्ष

अधिकारी (Officer)

रोजगार प्रकार - पूर्णकालिक (Full Time)

पदांची संख्या  - १० जागा

शैक्षणिक योग्यता  - अर्जदार पुर्णकालिन युजीसी मान्यता प्राप्त विज्ञान किंवा इंजिनिअरिंग किंवा कृषीची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन  - मासिक वेतन - ४० हजार ते १,४०००० रुपये असेल.

वयाची मर्यादा - ३२ वर्ष 

सहाय्यक अधिकारी (Assistant Officer)

रोजगार प्रकार - पूर्णकालिक (Full Time)

पदांची संख्या - १४ 

शैक्षणिक योग्यता  - उमेदवार युजीसी द्वारा मान्यता प्राप्त संस्थेतून बीटेक B. Tech किंवा कृषी किंवा कृषीची पदवी उत्तीर्ण असावा.

वेतन - २२ हजार ते ६० हजार रुपये असेल.

वयाची मर्यादा  - २८ वर्ष 

अर्ज कसा करावा - 

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ  https://www.rcfltd.com

वर जाऊन संबंधित पदांची माहिती घ्यावी. माहिती घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. तो पर्याय निवडून अर्ज भरावा आणि अर्ज जमा करावा. अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२० आहे.

English Summary: job opportunities in National Chemicals & Fertilizers ; apply on link
Published on: 26 June 2020, 08:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)