इस्रो-लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरने लाइट व्हेइकल चालक, कुक, फायरमॅन आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्जदार लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC) नोकरी अधिसूचना २०२१ साठी ०६ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे अवजड वाहन चालकाची २ पद, हलक्या वाहन चालकांची २ पद, कुकची १ पद, फायरमनची २ पद आणि कॅटरिंग अटेंडंटचचं १ पद अशी भरती होणार आहे.
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSLC/SSC/मॅट्रिक (इयत्ता १० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जड वाहन चालकास किमान ५ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा. यामध्ये अवजड वाहन चालवण्याचा ३ वर्षे आणि हलके वाहन चालविण्याचा २ वर्षे अनुभव उमेदवारास असावा. हलक्या वाहन चालकाला ३ वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव असावा. कुक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला चांगल्या हॉटेल किंवा कँटीनमध्ये ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा किती असावी?
जड वाहन चालक, लाइट व्हेइकल चालक आणि कुकसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. फायरमॅन आणि केटरिंग अटेंडंट पदासाठी, उमेदवारांचे वय ०६ सप्टेंबर २०२१ रोजी २५ वर्षांपेक्षा कमी असावे. निवडलेल्या उमेदवारांना महिन्याला १८,००० ते ६३,२०० रुपयांपर्यंत पगार मिळेल. हे वेतन पॅकेज ज्या पदासाठी ते निवडले जाईल त्या संदर्भानुसार भिन्न असेल.
उमेदवार ०६ सप्टेंबर २०२१ पर्यंत ISRO-Propulsion System Center (LPSC) च्या अधिकृत वेबसाइट https://www.lpsc.gov.in/ द्वारे नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची अधिसूचना तपासण्याची थेट लिंक https://www.lpsc.gov.in/noticeresult.html#Demo2 आहे.
Published on: 28 August 2021, 11:16 IST