गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. अनेक शेतकरी सध्या आधुनिक शेती करतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. आता बारामती येथील मळद गावाचे शेतकरी प्रल्हाद गुलाबराव वरे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या शेतात पिकवलेले पिवळे कलिंगड (Watermelon) भेट दिले. हे कलिंगड बघून जयंत पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
याबाबत जयंत पाटील यांनी हे फोटो ट्विट करून माहिती दिली आहे. पाटील म्हणाले, बारामतीच्या मळद गावातील शेतकरी प्रल्हाद गुलाबराव वरे यांनी आज मुंबई येथे भेट घेतली व हे पिवळे कलिंगड भेट दिले. या पिवळ्या कलिंगडाकडे पाहिल तर आपल्याला खात्री पटेल की जगापेक्षा वेगळं करण्याचा बारामतीकरांकडे चांगलाच हातखंडा आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातही असेच नावीन्यपूर्ण प्रयोग करून अधिकाअधिक प्रगती करावी, असे ते म्हणाले.
मूळ तैवान येथे पिकवल्या जाणाऱ्या या फळाची लागवड वरे गेल्या ४ वर्षांपासून बारामतीत करत आहेत. जास्त गर आणि प्रचंड गोड असलेल्या या फळला चांगला बाजार भाव मिळत आहे. यामुळे यामधून ते चांगले पैसे कमवतात. वरे हे ३० वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून कृषीक्षेत्रात कार्यरत आहेत. कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवे प्रयोग करत आहेत. यामुळे त्यांची शेती बघायला देखील अनेकजण येत असतात.
आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी असे नावीन्यपूर्ण प्रयोग करून अधिकाअधिक प्रगती करावी अशा शब्दात जयंत पाटलांनी शेतकरी वरेंचे कौतुक करत शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचे आवाहन केले आहे. पाटील यांनी कलिंगडाच्या शेतीबाबाबत विचारपूस करून स्वत: हे कलिंगड कापून चव घेतली आणि वरेंचे चांगलेच कौतुकही केले.
महत्वाच्या बातम्या;
आता शेतातील पाचट जाळली तर होणार गुन्हा दाखल, 15 हजारांचा दंडही होणार
आता जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोबाइल अँपची निर्मिती, आता घरबसल्या करा व्यवहार
शेतकऱ्यांनो अतिरिक्त उसाची माहिती 'या' नंबरवर द्या, तरच होणार तोडीचे नियोजन, सरकारने केले नियोजन..
Published on: 07 April 2022, 10:45 IST