News

गेल्या दोन दिवसापासून औरंगाबादसह भारतातील बऱ्याच भागात पावसाने झोडपून काढले.अगोदरच सगळ्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने कहर केला आहे.त्यामुळे हजारो हेक्टर शेती पिकांचे व शेतीचे नुकसान झाले म. यादरम्यान आता 27 सप्टेंबर पासून राजस्थान मधून पावसाने परती चा प्रवास सुरू केला आहे.

Updated on 09 October, 2021 9:08 AM IST

गेल्या दोन दिवसापासून औरंगाबादसह भारतातील बऱ्याच भागात पावसाने झोडपून काढले.अगोदरच सगळ्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने कहर केला आहे.त्यामुळे हजारो हेक्टर शेती पिकांचे व शेतीचे नुकसान झाले म. यादरम्यान आता 27 सप्टेंबर पासून राजस्थान मधून पावसाने परती चा प्रवास सुरू केला आहे.

 परतीच्या पावसाने उंबरे जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातलाय. अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दहा ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर कमी होत जाईल अशी चिन्हे आहेत. परंतु येत्या काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आणखी एका चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याची माहिती,प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

 त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत केरळ किनारपट्टी जवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा पूर्वेकडे बंगालचा उपसागराकडे सरकत आहे. येणाऱ्या पुढील पाच दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राची रूपांतर चक्रीवादळातहोण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार साधारणत  चौदा ते पंधरा तारखेला हे जवाद चक्रीवादळ निर्माण होणार आहे. 16 ऑक्टोबरला जवाद हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे.त्यामुळे या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील विदर्भ, पूर्व मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली,लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.

त्यामुळे येणार्‍या 16 ते 17 ऑक्टोबरला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

 कोकण व दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सोडून उर्वरित महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसात परतीचा पाऊस पूर्णपणे माघार घेईल असे दिसत आहे. जवाद चक्रीवादळाचा परिणाम म्हणून  महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात थंडीचे आगमन उशिरा होईल अशी शक्यता आहे

English Summary: jawaad cyclone create in at kerala sea coast area
Published on: 09 October 2021, 09:08 IST