News

जम्मू-काश्मीर राज्याला दुग्ध उत्पादन मध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुग्धगाव बनणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात सोळा जास्त लोकसंख्या असलेले गावांची निवड केली जाणार आहे.

Updated on 25 August, 2021 8:14 PM IST

 जम्मू-काश्मीर राज्याला दुग्ध उत्पादन  मध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुग्धगाव बनणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात सोळा जास्त लोकसंख्या असलेले गावांची निवड केली जाणार आहे.

 सरकारची 100 दुग्ध गावे बनवण्याची योजना आहे. या गावांमध्ये चिलिंग प्लांट स्थापन करण्यासोबतच दुधावर प्रक्रिया करणाऱ्या प्लांट सुद्धा स्थापन केले जाणार आहेत. ज्याद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून 1500 युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

 राज्यामध्ये दूध उत्पादन वाढविणे आणि युवकांना रोजगार निर्माण करणे यासाठी एक विशेष योजना तयार केली गेली आहे. याद्वारे सहा नवीन दुग्धगाव कॅपेक्स बजेट नुसार मंजूर केले गेले आहेत. यामध्ये शोपिया मध्ये दोन, पुलवामा,राजौरी,गांदरबल आणि पुंछमध्ये प्रत्येकी एक एक गाव बनवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावाला ऐंशी लाख रुपये निर्धारित करण्यात आले आहेत. या पैशांच्या माध्यमातून मशिनरी तसेच विविध प्रकारची उपकरणे आणण्यासाठी तसेच मार्केट कनेक्टिविटी साठी हा पैसा वापरण्यात येणार आहे. राजौरी, अनंतनाग, जम्मु, शोपिया, रियासी,कुपवाडा आणि बडगाम त्या जिल्ह्यातील आठ गावांना सुद्धा 80 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

 

दुग्धगावांची निवड करण्यासाठी जिल्हा प्रशासन संबंधित पशुपालन विभाग तसेच स्थानिक काही संस्था किंवा व्यक्तींची मदत घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात आज प्रयत्न राहील की  सगळ्या गावांची निवड केली जावी की ज्या गावांमध्ये दूध उत्पादन क्षमता जास्त आहे. अशा गावांना शंभर टक्के सरकारी आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच तसेच संबंधित विभाग सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील भागीदारी सोबत 100 दुग्ध गाव आणि चिलिंग प्लांट स्थापन करण्यासाठी बँक तसेच वित्तीय संस्थांबरोबर सक्रिय स्वरूपात समन्वय करीत आहे.

English Summary: jammu and kashmir goverment to take stape at growth of milk production
Published on: 25 August 2021, 08:14 IST